अंदाज चुकला तर हवामान विभागाला टाळे ठोकू, शेतकरी संघटनेचा इशारा

बीड : हवामान विभागाचा पावसाचा अंदाज चुकला तर, आम्ही हवामान विभागाला टाळे ठोकू, असा इशारा बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने दिला आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. मात्र सतत हवामान विभागाच अंदाज चुकत असल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. यंदा जर हवामान विभागाचा अंदाज चुकला तर शेतकरी संघटना […]

अंदाज चुकला तर हवामान विभागाला टाळे ठोकू, शेतकरी संघटनेचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 02, 2019 | 8:32 PM

बीड : हवामान विभागाचा पावसाचा अंदाज चुकला तर, आम्ही हवामान विभागाला टाळे ठोकू, असा इशारा बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने दिला आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. मात्र सतत हवामान विभागाच अंदाज चुकत असल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. यंदा जर हवामान विभागाचा अंदाज चुकला तर शेतकरी संघटना हवामान विभागाला टाळे ठोकणार आहे.

या सर्व प्रकाराबाबत यापूर्वीच शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन हवामान विभागाच्या फसव्या अंदाजाबाबत सांगितलेले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून हवामान विभाग सांगत असलेला अंदाज चुकत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. दरवर्षी हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार शेतकरी शेतात बियांणाची पेरणी करतो. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान  होते. या कारणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने मान्सूनचा खोटा अंदाज सांगू नये, यामुळे शेतकऱ्याचे किमान बी-बियाणांची तरी पैसे वाचतील आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. अस मत बीड येथील शेतकरी संघटनेचे नेते गंगाभिषण थावरे यांनी मांडले आहे.

देशातील प्रत्येक शेतकरी हा हवामान विभागावर अवलंबून राहून शेतीचे नियोजन करतो. यंदाही 4 ते 6 जून पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी हवामान विभाग मान्सुन दाखल होण्याचा अंदाज वर्तवते, यंदाही हवामान विभागाने 4 ते 6 जून दरम्यान मान्सुन केरळात दाखल होण्याची माहिती दिली आहे. पण आज (2 जून) आंध्र प्रदेशमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.