CCTV | चावी गाडीला विसरल्याने धावपळ, बॅंकेत काचेच्या दरवाजावर धडकून महिलेचा मृत्यू

| Updated on: Jun 16, 2020 | 5:57 PM

स्कुटीची चावी गाडीला विसरल्याने गडबडीत बॅंकेबाहेर निघालेली महिला काचेच्या दरवाजावर आदळून अतिरक्तस्रावाने मृत्युमुखी पडली (Kerala Woman dies after she runs into glass door of bank)

CCTV | चावी गाडीला विसरल्याने धावपळ, बॅंकेत काचेच्या दरवाजावर धडकून महिलेचा मृत्यू
Follow us on

तिरुअनंतपुरम : स्कुटीची चावी गाडीला विसरल्याने बॅंकेत आलेली महिला पुन्हा धावत बाहेर निघाली. मात्र गडबडीत काचेच्या दरवाजावर आदळून रक्तस्राव झाल्याने काही वेळात तिचा मृत्यू झाला. केरळमध्ये घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Kerala Woman dies after she runs into glass door of bank)

बीना पॉल ही चाळीशीतील महिला एर्नाकुलममधील पेरुंबवूर येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत गेली होती. बँकेत असताना स्कुटीची चावी गाडीला विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे घाईत त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पेरुंबूर येथील पोलिस अधिकारी सी. जयकुमार यांनी दिली.

सीसीटीव्ही दृश्यांमध्ये बीना पॉल बॅंकेतून बाहेर पडायचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. लगबगीत त्या चुकून काचेच्या दाराशी गेल्या. ते बंद असल्याचे लक्षात न आल्याने वेगात असलेल्या पॉल काचेच्या दारावर जोराने आपटल्या आणि खाली पडल्या. डोके दरवाजावर आपटल्यानंतर काचेचे तुकडे झाले.

वेदनांनी विव्हळणाऱ्या बीना पॉल सावरुन लगेच उभ्याही राहिल्या. त्यांनी पोटावर हात धरल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसते. काचेचा तुकडा पोटात घुसल्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या, त्यात अंतर्गत रक्तस्त्रावही झाला. बॅंकेत रक्ताचे थेंबही सांडले होते, असे पोलिसांनी सांगितले.

बँकेतील कर्मचारी तात्काळ त्यांच्या मदतीला धावून आले होते. काही जणांनी त्यांना खुर्चीवर बसण्यास मदत केली. अवघ्या काही मिनिटात बीना पॉल यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

हेही वाचा : भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन

बीना पॉल यांच्या पश्चात पती आणि तीन मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी मंगळुरूमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. ती आल्यानंतर बीना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.

(Kerala Woman dies after she runs into glass door of bank)