AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)

भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन
| Updated on: Jun 16, 2020 | 2:44 PM
Share

जळगाव/ मुंबई : भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. (BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)

गेल्या काही दिवसांपासून हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी त्यांना जळगाववरुन मुंबईला हलवलं होतं.

दरम्यान, हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसंच  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

दोनवेळा आमदार

हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते. हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई उपचार सुरू असताना आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे.

भाजप नेते हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता.

भाजपने हरिभाऊ जावळे यांच्याकडे  जळगाव जिल्हाध्यक्षपद  सोपवलं होते. जळगाव जिल्हाध्यक्ष निवडताना मोठा राडा झाला होता. धक्काबुक्की, शाईफेक आणि राडेबाजीनंतर जळगाव जिल्ह्याचा भाजप अध्यक्ष ठरला होता. माजी आमदार आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे (BJP Jalgaon president selection) यांची ‘एकमताने’ निवड करण्यात आल्याची घोषणा,  भाजप खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली होती.

(BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)

कोण होते हरिभाऊ जावळे?

  • हरिभाऊ जावळे हे विद्यमान जळगाव भाजप अध्यक्ष होते
  • मोठ्या वादानंतर हरिभाऊ जावळे यांची या वर्षीच्या सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती
  • हरिभाऊ जावळे यांनी लोकसभा आणि विधानसभेचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
  • हरिभाऊ जावळे यांनी १९९९ ते २००४ पर्यंत विधानसभेवर निवडून गेले.
  • हरिभाऊ जावळे यांनी रावेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
  • २००७ मध्ये पोटनिवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते
  • मग २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी रक्षा खडसे यांना तिकीट मिळालं
  • त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले
  • मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिरीष चौधरींनी त्यांचा पराभव केला

संबंधित बातम्या 

शाईफेकीनंतर पोशाख बदलून रावसाहेब दानवे पुन्हा बैठकीत, धक्काबुक्कीनंतर अखेर जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष ठरला

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.