राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 2250 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 39 हजार पार

| Updated on: May 20, 2020 | 11:08 PM

राज्यात आज (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 2250 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 39 हजार पार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवागणिक वाढत चालला आहे (Maharashtra Corona Update). राज्यात आज (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे. राज्यात आज 697 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 10 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 26 हजार 581 रुग्णांवर उपाचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात कोरोनामुळे आज दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईचे 41, पुण्याचे 13 आणि नवी मुंबईचे 3 रुग्ण आहेत. तर पिंपरी-चिंचवड, सोलापूर, उल्हासनगर आणि औरंगाबादचे प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष तर 19 महिला आहेत. राज्यात आतापर्यंत 1390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 24,118 वर

राज्यात एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा थेट 24 हजार 118 वर पोहोचला आहे. यापैकी 841 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यात 4 हजार 477 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-पुणे वगळता उर्वरित राज्यातही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे कोरोना ग्रामीण भागातही फोफावत चालला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर कोरोनाविरोधात लढत आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची अपडेट

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण – 2250
आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या – 39,297
कोरोना बळी – 65 मृत्यू
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 1390
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – 697
एकूण डिस्चार्ज – 10,318

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

हेही वाचा :

राज्यपालांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, अधिकाऱ्यांसह मिलिंद नार्वेकरांची हजेरी

लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल

काही लोकांची पातळी खालची, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, निलेश राणेंच्या ट्विटवर जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन कोरोना योद्धाचा अपमान : अजित पवार