Akola Corona | अकोल्यात रुग्णांची संख्या 299 वर, 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाही

मंगळवार पाठोपाठ बुधवारीही 20 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 299 वर पोहोचली आहे.

Akola Corona | अकोल्यात रुग्णांची संख्या 299 वर, 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाही

अकोला : गेल्या चार दिवसांपासून अकोला शहरातील (Akola Corona Cases) जवळपास सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवार पाठोपाठ बुधवारीही 20 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 299 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण हे नवीन परिसरातही आढळून येत असल्याने अकोलेकरांची (Akola Corona Cases) चिंता वाढली आहे.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. अशा परिस्थितीत अकोलेकरांना कोरोनाच्या सायलेंट कॅरिअरपासून सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे शहरात चौफेर कोरोनाचं जाळं पसरलं आहे. आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालात 8 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश आहे.

आतापर्यंत 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी रात्री त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 19 जणांचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. अकोल्यात आतापर्यंत 167 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता 112 रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Akola Corona Cases).

बुधवारी 124 पैकी 104 कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रलंबित अहवालांपैकी 124 अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह , तर 104 अहवाल निगेटिव्ह आले.

  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 299
  • अ‍ॅक्टिव्ह रुग्ण – 112
  • मृत्यू झालेले रुग्ण – 19
  • आत्महत्या केलेले रुग्ण – 1
  • कोरोनामुक्त रुग्ण – 167

Akola Corona Cases

संबंधित बातम्या :

मालेगावात 24 तासात 42 नवे कोरोनाग्रस्त, एकाच कुटुंबातील 8 जणांना लागण

नवी मुंबईत 1321 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक 495 रुग्ण एपीएमसीतील, 9870 होम क्वारंटाईन

रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार, 29259 जण होम क्वारंटाईन

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा थरार, अवघ्या 7 तासात 8 जणांचा मृत्यू, तर तब्बल 94 रुग्ण वाढले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *