Pune Corona | पुण्यात कोरोनाचा थरार, अवघ्या 7 तासात 8 जणांचा मृत्यू, तर तब्बल 94 रुग्ण वाढले

गेल्या 24 तासात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 229 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा थरार, अवघ्या 7 तासात 8 जणांचा मृत्यू, तर तब्बल 94 रुग्ण वाढले

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या 7 तासात 94 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pune Corona Cases Updates) वाढ झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 4 हजार 496 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 229 बाधित रुग्णांचा (Pune Corona Cases Updates) मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रात्रीपासून सकाळी 9 वाजेपर्यंत 32 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दिवसभरात त्यात आणखी 94 रुग्णांची भर पडली. म्हणजेच सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात तब्बल 126 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

तर पुणे शहरात सध्या 3 हजार 891 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 235 आणि पुणे ग्रामीणमध्ये 370 कोरनाचे रुग्ण आहेत.

जनता वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

पुण्यातील जनता वसाहतमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मंगळवारी पाच नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जनता वसाहतमध्ये आतापर्यंत 18 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सदाशिव पेठेतील मेडिकलमध्ये काम करणारे पाच कर्मचारी आहेत. या पाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर 25 नागरीक क्वारंटाईन असून 20 जणांचा रिपोर्ट (Pune Corona Cases Updates) अजून प्रलंबित आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वसाहतीतील 10 गल्ल्या सील करण्याचं काम सुरु आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांचं आरोग्य तपासणी केली जात आहे. परिसर निर्जंतुक केला जातो.

जनता वसाहत एकूण 110 गल्ल्या असून सर्वत्र उपयोजना राबवल्या जात आहे. जनता वसाहतीत शुक्रवारी पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा आठ बाधित रुग्ण आढळून आले. पालिकेच्या नवीन नियमावलीनुसार जनता वसाहत प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली.

सुरुवातीला या वसाहतीतील एक रुग्ण डायलिसिससाठी रुग्णालयात गेला होता आणि या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यातच मेडिकलमध्ये काम करणारे पाच जण बाधित आढळून (Pune Corona Cases Updates) आले.

संबंधित बातम्या :

Lockdown 4.0 | कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार, पुणे महापालिकेची नियमावली

घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी, पुण्यातील ज्येष्ठांना मोठा आधार

नवा जॉब कसा सर्च करायचा? प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना?, विद्यार्थ्यांसाठी खास वेबिनार

चिंचवडमधील हॉटस्पॉट आनंदनगरात शेकडो नागरिक रस्त्यावर, जीवनावश्यक वस्तू संपल्याचा संताप

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *