रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार, 29259 जण होम क्वारंटाईन

रत्नागिरीत आतापर्यंत 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Ratnagiri Corona Positive Cases Update)

रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार, 29259 जण होम क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 20, 2020 | 4:57 PM

रत्नागिरी : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. रत्नागिरीत आज एकाच दिवसात 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 106 वर पोहोचली आहे. (Ratnagiri Corona Positive Cases Update)

रत्नागिरी जिल्ह्यातील 82 जणांचा अहवाल दाखल झाला. यात 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात रत्नागिरीतील 4, संगमेश्वरमधील 6 तर गुहागरमधील 4 रुग्णांचा समावेश आहे. या आकडेवारीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 106 झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या आता 29 हजारांच्या वर पोहचली आहे. मुंबई, पुण्यातील अनेक चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 11 हजार 490 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

तर एकूण 29 हजार 259 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 29 हजार 259 वर पोचली असून येणाऱ्या कालावधीत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान रत्नागिरीत आतापर्यंत 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत रत्नागिरीत 70 कोरोना रुग्ण आहेत.

(Ratnagiri Corona Positive Cases Update)

रत्नागिरीत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

  • मंडणगड तालुका – 23 रुग्ण
  • चिपळूण तालुका- 6 रुग्ण
  • दापोली तालुका- 19 रुग्ण
  • संगमेश्वर तालुका- 17 रुग्ण
  • खेड तालुका- 7 रुग्ण
  • रत्नागिरी तालुका- 24 रुग्ण
  • लांजा तालुका – 2 रुग्ण
  • गुहागर तालुका- 7 रुग्ण
  • राजापूर तालुका – 1 रुग्ण

संबंधित बातम्या : 

नवा जॉब कसा सर्च करायचा? प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना?, विद्यार्थ्यांसाठी खास वेबिनार

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होणार

रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त, अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.