नवी मुंबईत 1321 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक 495 रुग्ण एपीएमसीतील, 9870 होम क्वारंटाईन

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1321 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 39 कोरोनाबळी गेले आहेत. (Navi Mumbai Corona Cases Update)

नवी मुंबईत 1321 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक 495 रुग्ण एपीएमसीतील, 9870 होम क्वारंटाईन

नवी मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 37 हजारवर पोहोचला असताना नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1321 वर पोहोचला आहे. तर 39 कोरोनाबळी गेले आहेत. सध्या नवी मुंबईत 9870 व्यक्तींना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Navi Mumbai Corona Cases Update)

नवी मुंबई महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमधील जवळपास 6 हजार व्यापारी, माथाडी कामगारांसह एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आतापर्यंत 495 व्यापारांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत दररोज प्रवास करणारे शासकीय तसेच वैद्यकीय कर्मचारी, दिड महिना सुरु ठेवण्यात आलेली एपीएमसी बाजारपेठ, पालिका अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव, अनुभवी डॉक्टरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे.

आठवडाभर बंद असलेली एपीएमसी बाजारपेठ सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे धान्य आणि मसाला मार्केटमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एपीएमसी बाजारात काम करणाऱ्या 495 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (Navi Mumbai Corona Cases Update)

एपीएमसीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत असून ही संख्या लवकरच आटोक्यात येईल, असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मार्केटच्या प्रवेशद्वारवर हॉटस्पॉटमधून येणाऱ्या गाड्यांवर फवारणी केली जाते. मात्र ड्रायव्हर, क्लिनर किंवा व्यापाऱ्याची टेस्टिंग केली जात नाही.

चार दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकानेही एपीएमसी मार्केटमध्ये तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी वाढते रुग्ण पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. या पथकाने आतापर्यंत तीन वेळा नवी मुंबईला भेट दिली आहे.

दरम्यान नवी मुंबईतील वाढत्या संख्या पाहता वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात 1200 खाटांचे विशेष कोविड रुग्णालय उभारले जात आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी पालिकेने आतापर्यंत केवळ 250 खाटा तयार ठेवलेल्या आहेत. तसेच शहरातील नऊ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी 550 खाटा तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबईतील कोरोना रिपोर्ट

  • कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या- 8867
  • कोरोना पॉझिटिव्ह – 1321
  • निगेटिव्ह – 6762
  • प्रलंबित- 784
  • वाशी येथील कोरोना केअर येथील नागरिक संख्या – 96
  • इंडियाबुल्समधील कोरोना केअर नागरिक संख्या- 120
  • घरातच क्वारंटाईन असलेल्या व्यक्ती- 9870
  • वाशी येथील कोव्हीड 19 विशेष रुग्णालयात येथे दाखल- 54
  • कोरोनामुळे मृत्यूची संख्या- 39
  • कंटेन्मेंट क्षेत्र-109

“एपीएमसी मार्केटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी 20 रुग्ण असलेल्या नवी मुंबईत दीड महिन्यात 1000 वर रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे एपीएमसीतील आहेत. तर इतर रुग्ण हे कोपरखैराणे, तुर्भे, घणसोली, नेरुळ या भागातील आहेत. दरम्यान जर एपीएमसी मार्केटमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असेल तर सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन आंदोलन करु,” असा इशारा भाजप आमदार गणेश नाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Navi Mumbai Corona Cases Update)

संबंधित बातम्या : 

Lockdown 4 | पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना, कंटेनमेंट झोन 64 वर, काय आहेत बदल?

मालेगावात 24 तासात 42 नवे कोरोनाग्रस्त, एकाच कुटुंबातील 8 जणांना लागण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *