रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त, अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू

पनवेल महापालिका क्षेत्रातील 18, पनवेल ग्रामीणमधील 2, उरणमधील 2, पेणमधील 3 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. (Raigad Corona Patients Latest Update)

रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त, अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यात 25 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर अलिबागमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वीस रुग्ण कोरोनामुक्त झाले. (Raigad Corona Patients Latest Update)

रायगड जिल्ह्यात आढळलेल्या एकूण 571 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 201 जण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 349 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काल (19 मे) दिवसभरात 25 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 18, पनवेल ग्रामीणमधील 2, उरणमधील 2, पेणमधील 3 रुग्णांचा समावेश आहे.

दिलासा देणारी बाब म्हणजे, दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोना मात दिली असून, ते पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 7, पनवेल ग्रामीणमधील 8, उरणमधील 4, पेणमधील 1 रुग्णाचा समावेश आहे. तर अलिबागमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा : उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित

आतापर्यंत रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 21 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 10 रुग्ण पनवेल महापालिका क्षेत्रातील आहेत. तर पनवेल ग्रामीण 3, पोलादपूर 1, महाड 3, कर्जत 1, खालापूर 1, मुरुड 1, अलिबागमधील 1 रुग्ण आहे.

कोविड-19 ने बाधित झालेले 201 रुग्ण (पनवेल मनपा 132, पनवेल ग्रामीण 35, श्रीवर्धन-5, उरण-20, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1, अलिबाग-3, पेण-1) आतापर्यंत बरे झाले आहेत.

सध्या पनवेल मनपा-147, पनवेल ग्रामीण-78, उरण-110, अलिबाग-1, तळा-1, खालापूर-1, कर्जत-1, महाड-1, पेण-3, माणगाव-6 अशा 349 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

आजच्या दिवसातील अपडेट :

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यातील वाढ सुरुच, 41 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई-पुण्याहून आलेल्या 8 जणांना कोरोना, बीडमधील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

(Raigad Corona Patients Latest Update)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *