महाविकास आघाडी सरकारला जनभावना कळते, योग्यवेळी धार्मिकस्थळे उघडू; राष्ट्रवादीचं भाजपला उत्तर

| Updated on: Oct 13, 2020 | 7:59 PM

महाविकास आघाडी सरकारला जनभावना समजते. त्यामुळे योग्यवेळी राज्यातील मंदिरे व सर्व धार्मिकस्थळं उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारला जनभावना कळते, योग्यवेळी धार्मिकस्थळे उघडू; राष्ट्रवादीचं भाजपला उत्तर
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi)  सरकारला जनभावना समजते त्यामुळे लवकरच आणि योग्यवेळी राज्यातील मंदिरे व सर्व धर्मस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (NCP Mahesh Tapase) यांनी दिली. मंदिरं चालू करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर तपासे यांनी उत्तर दिलं. (Mahesh Tapase Slam Bjp over Temple issue)

“भाजपा मंदिराच्याबाबतीत राजकारण करत आहे. आंदोलने जरुर करा परंतु कुठल्या प्रश्नावर आंदोलने केली पाहिजे याचं भान भाजपाच्या नेत्यांना राहिलेले नाही, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे. तर लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं सरकारची प्राथमिकता असल्याचं सांगत योग्य वेळी मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकार घेईल”, असं ते म्हणाले.

“मंदिर प्रवेश किंवा देवदर्शन हा एक भावनिक मुद्दा आहे. यावर राजकारण करण्याऐवजी भाजपाच्या नेत्यांनी लोकांची उपजीविका कशी सुधारेल, लोकांना, तरुणांना रोजगार कसा मिळेल यावर काम करावे आणि केंद्र सरकारकडे राज्याचा असलेला जीएसटीचा परतावा परत कसा मिळेल यासाठीही आंदोलन करण्याचे धाडस दाखवावे”, असे आव्हान महेश तपासे यांनी भाजपच्या नेत्यांना दिले.

“जनतेच्या जनभावनेचा आदर करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे मंदीरेच नव्हे तर सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील यात शंका नाही”, असेही महेश तपासे यांनी सांगितले.

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?” असा उपरोधिक सवाल विचारणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं.
“दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडली होती. पण त्यानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे कोव्हिड संबंधी काळजी घेण्याच्या सर्व सूचना देऊन प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा करावी” अशी विनंती राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना केली.

मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना तोडीस तोड प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर दिलं आहे. यामध्ये कोरोना ते कंगना अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची कानउघणी केली आहे. दरम्यान, माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले.

पवारांकडून राज्यपालांची मोदींकडे तक्रार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार काय?, असा परखड सवाल शरद पवार यांनी मोदींना केला आहे. तसेच राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं असल्याची तक्रारही त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

संबंधित बातम्या

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे