AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

"माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 13, 2020 | 1:09 PM
Share

मुंबई : “माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले. “माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. (CM Uddhav Thackeray answers to letter of Governor Bhagatsingh Koshyari over secularism)

उद्धव ठाकरेंनी पत्रात काय लिहिले?

“प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

“आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे” असेही उद्धव ठाकरेंनी सुनावले.

“आपण म्हणता गेल्या तीन महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील तीन पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो” असेही उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितले.

कोश्यारी यांनी पत्रात काय लिहिले होते?

“तुम्ही एक जूनला पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊन या शब्दाला केराची टोपली दाखवलीत. त्यामुळे लॉकडाऊनला वैतागलेल्या जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. दुर्दैवाने चार महिन्यांनंतरही प्रार्थना स्थळांवरील बंदी कायम राहिली. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि बीचवर जाण्यास परवानगी दिली असताना देव-देवता लॉकडाऊनमध्ये असणं, यासारखा विरोधाभास नाही.” असा टोला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. गेल्या तीन महिन्यात धार्मिक, राजकीय नेते आणि एनजीओंनी माझी भेट घेतली आणि प्रार्थनास्थळे उघडण्याची विनंती केली, असेही कोश्यारी यांनी पत्रातून सांगितले.

“हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अयोध्या दौऱ्यातून आपण भगवान श्रीरामाविषयीच्या भक्तीचे जाहीर दर्शन दिलेत. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईची पूजा केली होतीत. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की काय, याचे मला आश्चर्य वाटते. की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती धर्मनिरपेक्षता तुम्ही अंगिकारली की काय, याचेही कुतूहल वाटते” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रात म्हटले होते.

“दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडली होती. पण त्यानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे कोव्हिड संबंधी काळजी घेण्याच्या सर्व सूचना देऊन प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा करावी” अशी विनंती राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना केली आहे.

संबंधित बातम्या :

कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त

(CM Uddhav Thackeray answers to letter of Governor Bhagatsingh Koshyari over secularism)

Follow Us
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....