चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
चाकण एमआयडीसी प्रकरणी पवारांनी काय ट्विट केलं होतं, चाकण एमआयडीसीमध्ये तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, पाणी, वीज, रस्ते या समस्यांमुळे स्थलांतरणाचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे. हे उद्योग स्थलांतरित होऊ नये, रोजगार संधी टिकाव्यात, यासाठी सरकारने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्यात. मात्र या कंपन्या […]
चाकण एमआयडीसी प्रकरणी पवारांनी काय ट्विट केलं होतं, चाकण एमआयडीसीमध्ये तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, पाणी, वीज, रस्ते या समस्यांमुळे स्थलांतरणाचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे. हे उद्योग स्थलांतरित होऊ नये, रोजगार संधी टिकाव्यात, यासाठी सरकारने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्यात. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती नोकऱ्या गेल्या..याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाहीये. हे अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलेलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. शरद पवार यांनी ही फेसबुक पोस्ट केली.
Published on: Aug 14, 2026 12:47 PM
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप

