Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय….
आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या तरतुदींचे पालन केल्याचे म्हटले आहे. माझा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री करणे हे घटनेविरोधात असल्याचे राऊत यांनी म्हटले.
आमदार अपात्रतेच्या निर्णयावर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा निर्णय कायद्याच्या तरतुदींचे पालन करूनच घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिठासीन अधिकारी म्हणून आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याची संविधानिक जबाबदारी माझी आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.
या निर्णयासाठी Disqualification of members on the grounds of defection rules 1986 आणि संविधानाच्या 10th schedule मधील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसारच योग्य निर्णय घेतला असल्याचा दावा नार्वेकर यांनी केला. मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय अत्यंत शाश्वत असल्याने तो निश्चितपणे सुप्रीम कोर्टात टिकून राहील, असेही नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, या निर्णयावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतरानंतर अपात्र ठरणार्या व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री करणे हे देशाच्या घटनेच्या, संविधानाच्या आणि 10th schedule च्या विरोधात असल्याचे राऊत यांनी म्हटले. या प्रकरणात सर्वांनी सामुदायिकपणे चूक केली असून, याचे निर्माते अमित शहा आता तोंड लपवून पळत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
Published on: Aug 14, 2026 11:58 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

