AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

| Updated on: Aug 14, 2026 | 12:20 PM
Share

अंबरनाथमधील भाजप मनसे राड्यावरून मनसे नेते आक्रमक झालेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे. मनसे शहराध्यक्ष शैलेश शिरकेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाईची जाधव यांची मागणी आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिले पोलीस स्टेशनचे. त्यात स्वतः तो नगरसेवक येऊन पहिली लाथ ही आमच्या शहराध्यक्षांना मारताना आम्ही पाहिले. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाचे ५० ते […]

अंबरनाथमधील भाजप मनसे राड्यावरून मनसे नेते आक्रमक झालेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे. मनसे शहराध्यक्ष शैलेश शिरकेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाईची जाधव यांची मागणी आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिले पोलीस स्टेशनचे. त्यात स्वतः तो नगरसेवक येऊन पहिली लाथ ही आमच्या शहराध्यक्षांना मारताना आम्ही पाहिले.

पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाचे ५० ते ६० कार्यकर्ते घुसून ही आमच्या शैलेशची गाडी आहे आणि ही पोलीस स्टेशनमध्ये आहे. म्हणजे पोलीस स्टेशनच्या परिसरामधली गाडी आहे. पोलीस असताना या गाडीची ही जर अशी परिस्थिती असेल, त्या गाडीत बघा आता पोलिसांच्या पोलीस स्टेशनमधल्या कुंड्या त्या गाडीत टाकल्यात.

Published on: Aug 14, 2026 12:20 PM

Follow Us