AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त

मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई राज्यपालांना रुचली नाही

कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 10, 2020 | 11:31 AM
Share

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशा शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. (Governor Koshyari express displeasure to CM Uddhav Thackeray via Principal Advisor on Kangana Ranaut issue)

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई राज्यपालांना रुचली नाही. त्यामुळे अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी नापसंती दर्शवली. कोश्यारी या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

कंगना रनौतची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले. “कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मेहता यांना सांगितले” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध नवीन नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद आमदारकीपासून राज्यपाल नियुक्त आमदार आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा अशा अनेक विषयांवर उभय पक्षांमध्ये मतभेद आहेत. (Governor Koshyari express displeasure to CM Uddhav Thackeray via Principal Advisor on Kangana Ranaut issue)

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर काल महापालिकेचा हातोडा पडला. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला होता. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

(Governor Koshyari express displeasure to CM Uddhav Thackeray via Principal Advisor on Kangana Ranaut issue)

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?