उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

कंगना रनौतने एक व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray) 

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 5:59 PM

मुंबई : “उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझं घरं तोडलं आहे. उद्या तुझा गर्व तुटेल,” अशी टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने केली. यावेळी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray)

“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला आहे. आज माझं घर तोडलं आहे, उद्या तुझा गर्व तुटेल. ही वेळेची किमया आहे, लक्षात ठेवा… प्रत्येकवेळी सारखंच राहत नाही.”

“आता मला वाटतं की, तुम्ही माझ्यावर फार मोठी मेहरबानी केली आहे. कारण मला माहिती होतं की काश्मिरी पंडितांवर काय बेतलं असेल, आज मी त्याचा अनुभव घेतला आहे.”

“आज मी या देशाला वचन देते, मी फक्त अयोध्यावरचं नव्हे तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेन. त्यातून देशावासियांचे प्रबोधन करेन. कारण मला माहिती होतं, की हे होणार. पण हे माझ्यासोबत झालं आहे. याची काही कारणं आहेत. काही पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे हे क्रौर्य, ही दहशत आहे. चांगलं झालं हे माझ्यासोबत घडले. याच्यामागे काही कारणं आहेत.

जय हिंद जय महाराष्ट्र…………..”असे कंगनाने या व्हिडीओत म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर मागच्या गेटने कंगना राहत्या घराकडे रवाना झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घराकडे दाखल झाली. घरी दाखल झाल्यानंतर कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसचे व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केले. “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे कॅप्शन तिने प्रत्येक व्हिडीओला दिले आहे. जवळपास पाच व्हिडीओ तिने ट्वीट केलं आहे.

कंगना मुंबईत

मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देत कंगना मुंबईला येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या कंगनाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला. मंडीहून चंदीगढला जाताना कंगनाने हमिरपूर जिल्ह्यातील एका मंदिरात थांबून दर्शन घेतलं. (Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray)

चंदीगढहून मुंबईला येण्यासाठी दुपारी 12.15 वाजता फ्लाईटने ती मुंबईत दाखल झाली. साधारण दुपारी तीनच्या सुमारास मुंबईत दाखल झाल्यानंतर तिला मागच्या गेटने राहत्या घरी रवाना करण्यात आलं. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घराकडे दाखल झाली. यावेळी तिच्यासोबत केंद्र सरकारने वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. त्यामुळे सीआरपीएफ जवानांचे पथक तिच्या सुरक्षेत असेल.

तसेच कंगना रनौतच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिसांचं महिला पथक आणि स्पेशल ब्रांच अधिकारी उपस्थित होते. तसेच तिच्या घरालाही पोलिसांनी बंदोबस्त दिला होता.

मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

कंगना रनौत हिच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला.

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.

“मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल, पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम” असे ट्वीट कंगनाने केले.

नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली असताना आता एक पाऊल पुढे जात तिने थेट ‘पाकिस्तान’ म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ड्रग्जचा आरोप ते हक्कभंग

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला जात आहे. तर कंगनाविरोधात विधिमंडळ सभागृहात  हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. (Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

कंगना रनौत मुंबईत दाखल, घरी पोहोचल्यानंतर कंगनाचं नवं ट्विट

Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची पावले

याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.