AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार

अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे, असे शेलार म्हणाले.

याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 09, 2020 | 12:24 PM
Share

मुंबई : “अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत होते, तर इतकी वर्ष कारवाई का झाली नाही, याकूब मेमनच्या घरावर कारवाई केली नाही, पण कंगनाला नोटीस दिल्यावर अवघ्या 24 तासात झालेली कारवाई ही सूडबुद्धीने आहे” असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. “मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी” या नवीन योजनेप्रमाणे ठाकरे सरकार काम करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला. (Ashish Shelar on BMC demolishing Kangana Ranaut Office)

“मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी करायची झाल्यास ती खूप मोठी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या वांद्रे स्थानकाशेजारील बहुमजली झोपडपट्ट्याही अनधिकृत आहेत. मग त्यावर कारवाई का झाली नाही? भाजप उद्यापासून महापालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी पाठवेल, आणि त्यांच्यावर 24 तासात कारवाई होते का, याचा पाठपुरावा करेल” असे आशिष शेलार म्हणाले.

“सुडाच्या भावनेने ही कारवाई होताना दिसत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे. कंगनाच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत असेल, तर जशी तत्परता तोडकाम करताना दाखवली, तीच भूमिका इतरांच्या बाबतीतही असायला हवी” असे शेलार म्हणाले.

“मुंबई महापालिकेचा गौरवशाली इतिहास प्रश्नांकित करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. ठाकरे सरकार अहंकारी आहे. ‘मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी’ या नवीन योजनेप्रमाणे ते काम करत आहेत” असा घणाघात त्यांनी केला.

“मुंबई किंवा महाराष्ट्र यांची तुलना पाकिस्तान अथवा पाकव्याप्त काश्मीरशी करणे चुकीचेच आहे. भाजप कंगनाच्या त्या भूमिकेशी असहमत असल्याचे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे.” असेही शेलार म्हणाले. (Ashish Shelar on BMC demolishing Kangana Ranaut Office)

“लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे यावर भाजपचा विश्वास आहे पण शिवसेनेने वापरलेले तिन्ही शब्द त्यांच्याच तोंडावर येऊन पडत आहेत. संजय राऊत यांनीच काळे लिखाण केले असल्याने डांबराची उपमा दिली.” असे आशिष शेलार म्हणाले.

“ज्या बॉम्बस्फोटच्या साखळीने मुंबई हादरली त्या याकूब मेमनच्या घरात बीएमसी घुसली नाही, याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या माणसाला पालकमंत्री केलं, ज्यांनी कसबला बिर्याणी खाऊ घातली त्या काँग्रेसला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही” असेही आशिष शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या :

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

‘कंगनापासून दूर राहा’, गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे 9 फोन

(Ashish Shelar on BMC demolishing Kangana Ranaut Office)

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...