मुंबई : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जसवंत सिंग यांच्या मुत्सद्दीपणाचे दाखले देत सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. (MNS Chief Raj Thackeray pays tribute on demise of Jaswant Singh)
“पोखरण 2 च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक. जसवंत सिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
पोखरण २ च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग ह्यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक.जसवंत सिंग ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. pic.twitter.com/5Gy8A61zk3
— Raj Thackeray (@RajThackeray) September 27, 2020
जसवंत सिंग गेल्या सहा वर्षांपासून कोमामध्ये होते. ते 8 ऑगस्ट 2014 रोजी आपल्या राहत्या घरी पाय घसरुन पडले होते. उपचारादरम्यान ते कोमामध्ये गेले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. ते कधी कधी डोळे उघडायचे, थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करायचे, असे त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंग यांनी सांगितले होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंग यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले होते. ते संरक्षण विषयातील तज्ज्ञही होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
जसवंत सिंग यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
“जसवंत सिंग यांनी संपूर्ण देशाची मन लावून सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि त्यानंतर राजकारणात प्रदीर्घ कार्यकाळात. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले. अर्थ, रक्षा आणि परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन
(MNS Chief Raj Thackeray pays tribute on demise of Jaswant Singh)