Jaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. (Ex Cabinet minister Jaswant Singh Died)

Jaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. (Ex Cabinet minister Jaswant Singh Died)

जसवंत सिंह हे गेल्या सहा वर्षांपासून कोमामध्ये होते. जसवंत सिंह हे आपल्या राहत्या घरी 8 ऑगस्ट 2014 ला पाय घसरुन पडले होते. यानंतर उपचारादरम्यान कोमामध्ये गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. ते कधी कधी डोळे उघडायचे, पण काही बोलायचे नाही, अशी माहिती त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंह यांनी दिली होती.

जसवंत सिंह यांनी 2014 ला निवडणुकीदरम्यान तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह यांच्याकडून श्रद्धांजली 

“जसवंत सिंह यांनी संपूर्ण देशाची मन लावून सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि त्यानंतर राजकारणात प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले. अर्थ, रक्षा आणि परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

“जसवंत सिंह यांना राजकारण आणि सामाजिक विषयातील अनोख्या दृष्टीकोनाबद्दल ओळखले जाते. भाजपला बळकटी देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. मला आमचा संवाद नेहमीच लक्षात राहिल,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार आणि समर्थकांच्या बरोबर आहे, ” असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं. (Ex Cabinet minister Jaswant Singh Died)

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI