पश्चिम बंगालमध्ये पोटच्या मुलांची हत्या करणारा बाप मुंबई पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jun 06, 2022 | 3:04 PM

पत्नीशी वाद झाल्यानंतर आरोपीनी दोन्ही मुलांना रागाच्या भरात संपवलं आणि तिथून पळ काढला होता. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली होती. त्यावेळी दुहेरी हत्याकांडानंतर संपुर्ण परिसर हादरून गेला होता.

पश्चिम बंगालमध्ये पोटच्या मुलांची हत्या करणारा बाप मुंबई पोलिसांच्या ताब्यात
पश्चिम बंगालमध्ये पोटच्या मुलांची हत्या करणारा बाप मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने पश्चिम बंगालमध्ये (Bangal) दुहेरी हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केलीय. आरोपीने स्वतःच्या पोटच्या दोन मुलांचा निर्घृण खून करून तिथून पळ काढला होता. आरोपीचे नाव खुदाबक्ष इम्रान शेख असं आहे. त्याने 10 वर्षांचा त्याचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगीची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी पश्चिम बंगालमधून पळून मुंबईत आला होता. पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचं समोर पोलिसांनी खुलासा केला आहे. क्राईम ब्राँचने आरोपीला मुलुंडमधून (Mulund) अटक केली आहे. अनेकदा अशा घटना झाल्यानंतर आरोपी इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात पळ काढतात. परंतु मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने त्यांचं कौतुक आहे.

नेमकं काय झालं

पत्नीशी वाद झाल्यानंतर आरोपीनी दोन्ही मुलांना रागाच्या भरात संपवलं आणि तिथून पळ काढला होता. ही घटना पश्चिम बंगालमध्ये
घडली होती. त्यावेळी दुहेरी हत्याकांडानंतर संपुर्ण परिसर हादरून गेला होता. त्यावेळी आरोपी खुदाबक्ष इम्रान शेख याने तिथून पळ काढला होता. त्यावेळी त्याच्याविरोधात बंगालमध्ये पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंगारा देऊन पळालेला आरोपी पोलिसाच्या हाती लागत नव्हता. मार्गावर असलेल्या पोलिसांना तो मुंलुंड येथे असल्याची भणक लागली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

पत्नीचं बरोबर झालेल्या भांडणांमुळं दोन मुलांची हत्या

मुलुंड पोलि्सांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. त्यामध्ये आरोपीने पत्नीचं बरोबर झालेल्या भांडणांमुळं दोन मुलांची हत्या झाल्याचं सांगितलं. देशात अशा अनेक गोष्टी घडत असतात. त्यामध्ये आरोपी लपण्यासाठी इतर राज्यांचा आसरा घेतात. आत्तापर्यंत अनेक असे आरोपी मुंबईच्या पोलिसांनी पकडले आहेत.