अविवा बेग होणार प्रियांका गांधींची सून, पत्रकारितेत पदवी ते राष्ट्रीयस्तराची फुटबॉल खेळाडू, अखेर..
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण असून प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान याचे लवकरच लग्न होणार आहे. तब्बल 7 वर्ष डेट केल्यानंतर रेहान हा गर्लफ्रेंडसोबत लग्न करतोय. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचे खासगी आयुष्य चांगलेच चर्चेत आले. रेहान याने तब्बल सात वर्ष डेट केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला. विशेष म्हणजे रेहान हा दिल्लीतील मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांनीही सात वर्ष डेट केल्यानंतर नवीन नात्याची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला. रेहान याने त्याची प्रेयसी अविवा बेग हिच्यासोबत साखरपुडा केला. रेहानच्या होणाऱ्या पत्नीचे नाव अविवा बेग असल्याचे कळाल्यापासून ती चांगलीच प्रसिद्धीत आली. अविवा बेग ही नेमकी कोण आहे, काय करते याबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. यापूर्वी रेहान आणि अविवा बेग यांच्या नात्याबद्दल फार काही लोकांना माहिती नव्हते. पण दोघे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
चला तर मग जाणून घेऊयात प्रियांका गांधी यांची होणारी सूनबाई नक्की काय करते. अविवा ही व्यवसायाने एक छायाचित्रकार आणि निर्माती आहे. तिचे शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले असून आपल्या आई वडिलांसोबत ती दिल्लीत राहते. अविवा हिने मॉडर्न स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले नंतर ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन आणि पत्रकारितेमध्ये पदवी घेतली.
फक्त हेच नाही तर अविवा बेग ही एक माजी राष्ट्रीयस्तराची फुटबॉल खेळाडू आहे. तिने अनेक फुटबॉल सामान्यात धमाल केली. फोटोच्या निमित्ताने अविवा ही संपूर्ण देशभरात फिरते. रेहान आणि अविवा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. सुरूवातीच्या काळात दोघे फक्त मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
प्रियांका गांधी हिचा लेक रेहान यानेही आपले शिक्षण दिल्ली आणि डेहराडूनमध्ये पूर्ण केले. त्यानंतर लंडनच्या SOAS विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. मोठा राजकीय वारसा लाभलेला रेहान राजकारणापासून तसा अजून दूर आहे. 29 ऑगस्ट 2000 रोजी जन्मलेला 25 वर्षीय रेहान प्रसिद्धीपासून असतो. आता लवकरच साखरपुड्यानंतर रेहान आणि अविवा लग्नबंधनात अडकतील.
