AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही मुलगी होणार प्रियांका गांधी यांची सून, लगीनघाई सुरू, जाणून घ्या प्रियांका गांधी यांच्या सूनेबद्दल, मुलगा रेहान..

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान हा सात वर्षापासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करत आहे. दोन्ही कुटुंबियांनी या लग्नाला होकार दिला.

ही मुलगी होणार प्रियांका गांधी यांची सून, लगीनघाई सुरू, जाणून घ्या प्रियांका गांधी यांच्या सूनेबद्दल, मुलगा रेहान..
Priyanka Gandhi
| Updated on: Dec 30, 2025 | 9:42 AM
Share

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी राजकारणात चांगल्याच सक्रिय असून अनेकदा संसदेत प्रियांका गांधी आवाज उठवताना दिसतात. याशिवाय अनेक मुद्द्यांमध्ये त्यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली. प्रियांका गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेतली असून भाऊ राहुल गांधींना खंबीरपणे साथ दिली. प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्याने नक्कीच काँग्रेसला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आली. रॉबर्ट वाड्रा यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप असून हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. आता प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी मोठे शुभकार्य पार पडणार आहे. प्रियांका गांधी सासूबाई होणार असून प्रियांका आणि रॉबर्ट यांच्या घरी सुनबाई येणार असून लवकरच प्रियांका गांधी यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडणार आहे.

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच साखरपुडा करणार असून तयारीही सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रेहान वाड्रा दिल्लीतील मुलीला सात वर्षापासून डेट करत होता. रेहान वाड्रा याच्या प्रेयसीचे नाव अविवा बेगला असून सात वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगोदर साखरपुडा होईल आणि त्यानंतर खास लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न पार पडेल.

दोन्ही कुटुंबियांनी या नात्याला होकार दिला असून साखरपुड्याची तयारी सुरू आहे. अविवा बेग आणि तिचे कुटुंब दिल्लीचे रहिवासी आहेत. रेहान आणि अविवा बेग अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघे अगोदर एकमेकांचे मित्र होते, त्यानंतर ते प्रेमात पडले. नवीन वर्षाच्या सुरूवातीला दोघांचा साखरपुडा पार पडेल, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

हा साखरपुडा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत होईल. मात्र, नेमका कुठे याबाबत अजून माहिती पुढे आली नाही. रेहान वाड्रा हा मामा राहुल गांधी यांचा लाडका असून राहुल गांधीला रेहान वाड्रा याच्यासोबत वेळ घालवण्यास आवडतो. बऱ्याचदा प्रियांका गांधी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय