AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final: लेकाची झुंझार खेळी, विरेंद्र सेहवाग भारावला; दमदार विजयानंतर खास पोस्ट!

भारताने शेवटच्या चेंडूवर 1 गडी राखून सामना जिंकला आणि विक्रमी नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या दमदार विजयानंतर भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय युवा खेळाडूंचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी विरेंद्र सेहवागने चार खेळाडूंचे विशेष कौतुकही केले.

U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final: लेकाची झुंझार खेळी, विरेंद्र सेहवाग भारावला; दमदार विजयानंतर खास पोस्ट!
| Updated on: Nov 14, 2026 | 9:30 PM
Share

U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final:  अंडर-19 आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अखेरच्या चेंडुवर थरारक विजय मिळवत सलग 9 व्यांदा आशिया कपचा किताब जिंकला. पाकिस्तानने दिलेल्या 338 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने शेवटच्या चेंडूवर 1 गडी राखून सामना जिंकला आणि विक्रमी नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या दमदार विजयानंतर भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय युवा खेळाडूंचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी विरेंद्र सेहवागने चार खेळाडूंचे विशेष कौतुकही केले.

टीम इंडियाचा दमदार विजय, सेहवागने केलं कौतुक!

टीम इंडियाच्या युवा शिलेदारांचे कौतुक करताना विरेंद्र सेहवागने एक्सवर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. वीरेंद्र सेहवागने लिहिले की हा एक उत्तम सामना होता आणि त्याचा शेवट त्याहूनही चांगला झाला. तो म्हणाला की अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 338 धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवण्यासाठी मोठ्या धैर्याची गरज होती.

“लक्ष्य रायचंदानी (80) आणि आर्यवीर सेहवाग (58) यांच्या खेळीचे सेहवागने कौतुक केले. त्यासोबतच जेव्हा आम्हाला चमत्काराची गरज होती तेव्हा मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांनी कमाल केली. विरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या या कामगिरीचे कौतुक करताना हा विजय दीर्घकाळ स्मरणात राहील आणि त्यांना या तरुण विजेत्यांचा अभिमान आहे,” असंही म्हटले आहे.

अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाचा रोमहर्षक विजय! 

दरम्यान, या सामन्यामध्ये 337 धावांचे लक्ष्य गाठताना, आर्यवीर सेहवाग (58) आणि लक्ष्य रायचंदानी (80 ) यांच्यामुळे भारताला चांगली सुरुवात मिळाली. मात्र मधली फळी चुकल्यानंतर संघ अडचणीत आला. एका क्षणी भारताने 252/ 8अशी धावसंख्या गाठली होती, परंतु मनाल चौहान (47) आणि मोहित उल्वा (49)* यांनी 57धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र पालटले. अखेरीस मोहितने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला 1 गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?