AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : खिशात पैसा टिकत नाही? मग फॉलो करा फेंग शुईच्या या सोप्या टिप्स, आयुष्यच बदलून जाईल

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे, ज्याचा उगम तर चीनमध्ये झाला मात्र हळुहळु याचा प्रसार जगभरात झाला. अनेकांच्या बाबतीमध्ये असं होतं की ते प्रचंड पैसा कमवतात, परंतु पैशांची बचत करू शकत नाही, पैसा कोण त्या न कोणत्या कारणांमुळे खर्च होतो. असं होऊ नये, यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Feng Shui : खिशात पैसा टिकत नाही? मग फॉलो करा फेंग शुईच्या या सोप्या टिप्स, आयुष्यच बदलून जाईल
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 8:55 PM
Share

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. सुरुवातीला फक्त चिनीमध्येच फेंगशुईला मान्यता होती. मात्र त्यानंतर हळुहळु फेंग शुईचा प्रसार जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये झाला. आज अनेक देशांमध्ये फेंग शुईमधील उपाय केले जातात. अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते पैसा प्रचंड कमावतात. दिवस रात्र मेहनत करतात. परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. खर्चाचं प्रमाण जास्त असतं. खर्चाला आळा बसावा आणि हातात आलेला पैसा टिकावा यासाठी फेंग शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे तुमच्या हातात आलेल्या पैशांची बचत तर होईलच परंतु त्याचबरोबर चुंबकांप्रमाणे पैसा तुमच्या घराकडे आकर्षीत होतील, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे. चला तर मग पाहूयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

पाकिट- फेंग शुईनुसार तुमच्या खिशात असलेलं तुमचं पैशांचं पाकिट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये कोण कोणत्या वस्तू ठेवतात? त्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर पडत असतो. त्यामुळे पाकिटात काधीही धारदार वस्तू, फाटलेल्या नोटा, तसेच चलनात नसेलेले जुने नाणे, पूर्वजांचे फोटो अशा गोष्टी चुकूनही ठेवू नये, तसेच तुमचं पाकिट हे कधीही फाटलेलं नसावं, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

नेटांचा क्रम- फेंग शुईनुसार तुमच्या पाकिटात तुम्ही ज्या नोटा ठेवतात त्या नेहमी चढत्या क्रमाणे असाव्यात, म्हणजे सगळ्यात आधी दहाची नोट, त्यानंतर वीसची नोट, त्यानंतर पन्नास रुपयांची नोट, त्यानंतर शंभर रुपयांची नोट, त्यानंतर पाचशे रुपयांची नोट असा नोटांचा क्रम असावा. यामुळे तुमच्या पाकिटात सदैव पैसा टिकून राहतो, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आलं आहे.

चांदीचा शिक्का – फेंग शुई शास्त्रामध्ये चांदीला शुभ धातू माण्यात आलं आहे, फेंग शुई शास्त्रानुसार जर तुमच्या पाकिटात चांदीचा शिक्का असेल तर आयुष्यात तुम्हाला कधी पैशांची कमी भासत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?