पाकिस्तानमध्ये नवे इंटरनेट नियम, सरकारकडे सोशल मीडिया सेन्सॉरशीपचे निरंकुश अधिकार

| Updated on: Nov 20, 2020 | 4:12 PM

पाकिस्तानमध्ये (Pakistan) इंटरनेटबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांमधून पाकिस्तान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सेन्सॉरशिप करण्याचे अधिकार मिळाले आहे.

पाकिस्तानमध्ये नवे इंटरनेट नियम, सरकारकडे सोशल मीडिया सेन्सॉरशीपचे निरंकुश अधिकार
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इंटरनेटबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांमधून पाकिस्तान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सेन्सॉरशिप करण्याचे अधिकार मिळाले आहे. अनेक सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांनी या नियमांमध्ये शिथिलता ठेवण्याची मागणी केली होती, मात्र इम्रान सरकारने या कंपन्यांची विनंती फेटाळत नव्या नियमांना मंजूरी दिली. या नव्या नियमांमुळे इम्रान सरकारला अनियंत्रित सेन्सॉरशिपचे (Censorship) अधिकार मिळाल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानमधील नागरिकांचं सोशल मीडिया वापराचं स्वातंत्र्य देखील संपणार असल्याची चर्चा आहे (Pakistan Imran Government has changed internet rules in the country).

पाकिस्तान एक मुस्लीम बहुल देश आहे. येथे आधीच सोशल मीडिया आणि इंटरनेट वापराबाबत कठोर नियम होते. अनेक प्रकरणांमध्ये तर पाकिस्तानचे नियम आधुनिक देशांच्या तुलनेत प्रचंड रुढीवादी देखील मानले गेले आहेत. मागील महिन्यात पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (पीटीए) ‘अनैतिक आणि असभ्य’ कंटेंट आपल्या साईटवरुन न हटवल्याने टिकटॉकवर बंदी घातली होती. इम्रान खान यांच्या कॅबिनेटने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या नियमांना मंजूरी दिली आहे.

नव्या नियमांनुसार पाकिस्तानच्या पीटीए विभागाला त्यांना वाटणारा चिथावणीखोर डिजिटल कंटेंट साईटवरुन हटवण्याचे आणि ब्लॉक करण्याचे अधिकार मिळाले आहेत. या अंतर्गत ‘पाकिस्तानच्या अखंडता आणि सुरक्षे’ला धोका तयार होईल असा कोणताही कंटेंट हटवता येणार आहे.

अशा प्रकरणांमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सोशल मीडिया कंपनी किंवा सर्विस प्रोव्हायडरला 3.14 मिलियन डॉलरपर्यंत दंडाची तरदूत करण्यात आलीय. ‘दहशतवाद, असभ्य भाषा, अश्लीलता, हिंसा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ निर्माण करेल असा डिजीटल कंटेंट अपलोडिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आक्षेपार्ह कंटेंट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 24 तासात आणि आपत्कालीन स्थिती 6 तासात हटवावा लागेल. नवे नियम टेलीकॉम अॅथॉरिटीला संपूर्ण ऑनलाईन सिस्टम ब्लॉक करण्याचे अधिकारही देते. पीटीएचे प्रवक्ते खुर्रम मेहरान यांनी सांगितलं की हे नियम परदेशी सोशल मीडिया कंपन्यांसोबत अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी तयार करण्यात आले.

पाकिस्तानमधील या नव्या नियमांनुसार देशात ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 5 लाख (अर्धा मिलियन) पेक्षा अधिक यूजर्स असतील त्यांना 9 महिन्यांच्या आत पीटीएसोबत नोंदणी करावी लागेल. तसेच 18 महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये एक कायमस्वरुपी कार्यालय आणि डेटाबेस सर्व्हर स्थापन करावं लागेल.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल

बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO

व्हिडीओ पाहा :

Pakistan Imran Government has changed internet rules in the country