ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल

"पाकिस्तानी सैन्याचं दहशतवादी संघटनांशी संबंध होते. पाकिस्तान अतिरेक्यांचा वापर अफगाणिस्तान आणि भारत विरोधात कारवाई करण्यासाठी वापरायचा", अशी पोलखोल बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्ताकात केली आहे (Barack Obama explained how Osama killed).

ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 12:18 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेने 2 मे 2011 रोजी अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन या कुख्यात अतिरेक्याचा पाकिस्तानात शिरुन खात्मा केला होता. लादेनला पाकिस्तानात शिरुन कसं ठार केलं, याबाबत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्ताकात सांगितलं आहे (Barack Obama explained how Osama killed).

“पाकिस्तानी सैन्याचं आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचं अलकायदा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांसोबत संबंध होते, ही बाब लपून राहिलेली नाही. ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये लपून बसला होता. त्याचा खात्मा करण्यासाठी जी मोहिम आखण्यात येत होती त्यात पाकिस्तानला समावेश करुन घेण्यास माझा नकार होता. कारण पाकिस्तानी सैन्याचं दहशतवादी संघटनांशी संबंध होते. पाकिस्तान अतिरेक्यांचा वापर अफगाणिस्तान आणि भारत विरोधात कारवाई करण्यासाठी वापरायचा”, अशी पोलखोल बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्ताकात केली आहे.

“आम्ही लादेनचा खात्मा करण्यासाठी गुप्त मोहिम आखली. पण या मोहिमेला तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स आणि माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष जो बिडेन यांनी विरोध केला. आमच्या या गुपीत मोहिमेची माहिती कुणालाही कळली तर मोठी संधी आमच्या हातून निसटली असती. त्यामुळे सरकारमधील फक्त मोजक्याच मंत्र्यांना या मोहिमेची माहिती देण्यात आली होती”, असं ओबामा यांनी पुस्तकात सांगितलं आहे (Barack Obama explained how Osama killed).

“पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये लष्करी छावणी जवळ लादेन लपून बसला होता. पाकिस्तानी सैन्याचं अतिरेक्यांशी असलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेबाबत गोपनीयता ठेवणं मोठं आव्हान होतं. त्यामुळे लादेनला कसं मारायचं यासाठी अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला. मात्र, आम्ही कोणताही पर्याय अवलंबला असता तरी पाकिस्तानला मोहिमेत सामील करुन घेतलं नसतं”, असं मत त्यांनी मांडलं आहे.

“एबाटाबाद परिसरात लादेन जिथे लपून बसला होता तिथून अवघ्या काही मैलांवर पाकिस्तानी सैन्याच्या छावण्या होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांना काहीही सांगितल्याने मोहिमेची माहिती लीक होण्याची शक्यता वाढली होती. याशिवाय एबोटाबादमध्ये कारवाई करण्यासाठी कोणताही पर्याय अवलंबता येईल. पण मित्रराष्ट्राच्या हद्दीत जाऊन कारवाई केल्याने राजनैतिक संबंधही धोक्यात येईल. त्यात गुंतागुंतही वाढेल, असा विचार मनात येत होता”, असं ओबामा यांनी पुस्ताकात म्हटलं आहे.

“अंतिम टप्प्यात दोन मार्गांचा विचार केला गेला. हवाई हल्ला करायचा किंवा अधिकृत मिशनची घोषणा करायची. या अंतर्गत एक टीम लपून हेलिकॉप्टरने पाकिस्तानला जाईल, परिसरात छापा मारेल आणि पाकिस्तानी सैन्य किंवा पोलिसांनी प्रत्युत्तर देण्याआधी निघून येईल. ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमने दुसरा मार्ग अवलंबला. अखेर 2 मे 2011 रोजी पाकिस्तानमध्ये शिरुन लादेनचा खात्मा केला”, असं ओबामा यांनी सांगितलं.

“या मोहिमेनंतर जगभरातील अनेक लोकांशी मी फोनवर बातचित केली. मात्र, या सर्व लोकांमध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्याशी फोनवर बोलण्याआधी अवघडल्यासारखं वाटतं होतं. पण जेव्हा त्यांच्याशी फोनवर बातचित केली तेव्हा उलट त्यांनीच अभिनंदन केलं. त्याचबरोबर दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं”, असं ओबामा यांनी सांगितलं

‘भारत-अफगाणिस्तान एकत्र येऊ नये, अशी पाकिस्तानची इच्छा’

“पाकिस्तानने दहशतवादविरोधी अनेक कारवायांमध्ये आम्हाला सहकार्य केलं आहे. मात्र, पाकिस्तानतचे अतिरेक्यांशी संबंध आहेत हे सर्वांना ठाऊक होते. या अतिरेक्यांचा उपयोग ते अफगाणिस्तान सरकारला कमकूवत करण्यासाठी करायचे. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तानचे चांगले संबंध होऊ नये, अशी पाकिस्तानची इच्छा होती”, असं बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर कसं होणारं हा प्रश्न मला पडला होता: ओबामा

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.