Rajya sabha Election | कोरोना पॉझिटिव्ह आमदार PPE किट घालून मतदानाला, राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान

| Updated on: Jun 19, 2020 | 8:04 PM

राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज (19 जून) दिवसभरात दहा राज्यांमध्ये (Rajya sabha Election) निवडणुका पार पडल्या.

Rajya sabha Election | कोरोना पॉझिटिव्ह आमदार PPE किट घालून मतदानाला, राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान
Follow us on

भोपाळ : राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज (19 जून) दिवसभरात दहा राज्यांमध्ये (Rajya sabha Election) निवडणुका पार पडल्या. मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या जवळपास सर्वच आमदारांनी सहभागी होत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये मतदानासाठी एक कोरोना पॉझिटिव्ह आमदार पीपीई किट घालून विधानभवन येथे दाखल झाला (Rajya sabha Election).

मध्य प्रदेशच्या विधानभवन येथे आज सकाळपासून राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान सुरु होतं. सकाळपासून भाजप आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या सुमारास काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी पीपीई किट घालून विधानभवन येथे दाखल झाले. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर त्यांचा पीपीई किटमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर, मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी

आमदार कुणाल चौधरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, राज्यभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची होती. कारण काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारी लढवत होते. याशिवाय प्रत्येक आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

आमदार कुणाल चौधरी मतदान करुन परतल्यानंतर विधानभवनचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ज्याभागात मतदान सुरु होतं, तो भाग स्वच्छ करण्यात आला. याशिवाय विधानभवनचं मुख्य प्रवेशद्वाराचा परिसरही सॅनेटाईज करण्यात आला, जेणेकरुन कोरोनाचा धोका उद्भवू नये.

हेही वाचा : MPSC Result 2019 | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा पठ्ठ्या अव्वल 

मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं होतं. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह उमेदवारी लढवत होते. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती.

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक जिंकली, तर काँग्रेसलादेखील एका जागेवर विजय मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह विजयी झाले. तर भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेरसिंग सोलंकी यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते फूलसिंह बरैया यांचा पराभव झाला.

हेही वाचा : इकडे मोदींची सर्वपक्षीय बैठक, तिकडे हवाई दलप्रमुख लेहमध्ये दाखल, मिराज आणि सुखोई विमानं सज्ज