खासगी कंपनीकडून नागरिकांना 900 कोटींचा गंडा, अथर्व इन्फ्राची रत्नागिरीतील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

| Updated on: Nov 04, 2020 | 4:02 PM

अथर्व फॉर यु इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांना सुमारे 900 कोटींचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे.

खासगी कंपनीकडून नागरिकांना 900 कोटींचा गंडा, अथर्व इन्फ्राची रत्नागिरीतील कोट्यवधींची मालमत्ता जप्त
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरीतील ‘अथर्व फॉर यु इन्फ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो‘ प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांना (Ratnagiri Aatharva For You Infra And Agro Ltd.) सुमारे 900 कोटींचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी तालुक्यात अनेक तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी जिल्ह्यात सुमारे 28 कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यात जमीन, फ्लॅट आदींचा समावेश आहे (Ratnagiri Aatharva For You Infra And Agro Ltd.).

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा गुन्हा दाखल असल्याने तिकडेच इतर तक्रार दाखल करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

आर्थिक गुन्हे शाखा मुंबईने रत्नागिरी जिल्ह्यातील अथर्व इन्फ्रा या कंपनीची राज्यभरातील तब्बल 250 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, त्यांच्या फ्लॅटलाही सील करण्यात आले आहेत, त्याशिवाय जमिनीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अथर्व कंपनीने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आल्यानंतर कंपनीचे फ्लॅट आणि जमिनी आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. अथर्व इन्फ्रा या कंपनीमध्ये रत्नागिरीतील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकदारांच्या तक्रार झाल्यावर त्या नुसार पुढील तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व कंपनीच्या राज्यभरात 40 शाखा उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पनवेल, मुंबई, ठाणे, सांगली, रत्नागिरी येथील कार्यालयांचा समावेश आहे. या कंपनीने गोवा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी राज्यातही पाय पसरले होते. अथर्व इन्फ्रा कंपनी रत्नागिरीत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कार्यरत होती. मात्र, आपले हित साध्य होताच कंपनीकडून सर्व गुंडाळण्यात आले. महाराष्ट्रासह अनेक राज्यात अथर्व या कंपनीने शाखा उघडल्या होत्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Ratnagiri Aatharva For You Infra And Agro Ltd.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल