ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल

फेसबुकवरील एका पेजवरुन साडे 5 हजार रुपयांचा ड्रेस मागिवला. मात्र, पार्सलमध्ये चक्क रद्दीतील साड्या असल्याचं समोर आले.

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक, साडे पाच हजाराच्या ड्रेस ऐवजी रद्दी, वापरलेल्या साड्या पार्सल
वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली द्यायचे मोठमोठे टार्गेट, पूर्ण न केल्यास दंड वसूल करायचे
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 3:40 PM

वसई : ऑनलाईन खरेदीवर सध्या अनेकांचा भर आहे. पण, ऑनलाईन खरेदी (Online Shopping Fraud ) करताना आता सावधान राहाणंही तितकंच गरजेच आहे. वसईतील एका महिलेला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या महिलेने फेसबुकवरील एका पेजवरुन साडे 5 हजार रुपयांचा ड्रेस मागिवला होता. मात्र, पार्सल बॉक्समध्ये चक्क रद्दीतील साड्या असल्याचं समोर आले आहे. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात सदर महिलेने तक्रार दाखल केली आहे. गीता गुप्ता असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्या वसई पश्चिमकडे राहणाऱ्या आहेत (Online Shopping Fraud ).

वसईतील गीता गुप्ता यांनी फेसबुकच्या एका पेजवरुन साडे पाच हजाराचा ड्रेस मागवला होता. तो साडे पाच हजाराचा ड्रेस त्यांना डिस्काउंट मध्ये 1,300 रुपयांत मिळणार असे दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी तो ड्रेस dailyshopping.Com वरुन ऑनलाईन मागवला. दोन दिवसात पार्सल आले. पण आलेले पार्सल त्यांनी उघडून बघितल्यावर त्यांना धक्काच बसला आहे.

त्यात त्यांना चक्क रद्दीतल्या, वापरलेल्या साड्या पार्सल दिसल्या. पण, हे पार्सल चुकून आले असावे म्हणून त्यांनी दुसरी ऑर्डर केली तर दुसऱ्या ऑर्डर मध्येही तसेच झाले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात येऊन ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विरोधात तक्रार दिली. या सर्व प्रकारात ग्राहकांची फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.

ऑनलाईन खरेदी केलेली महिला माणिकपूर पोलीस ठाण्यात येऊन गेली, पण तिने तक्रार दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण जर पुन्हा तक्रार दिली तर आम्ही ती नोंद करुन याचा तपास करणार, असे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना आलेले पार्सल उघडून बघावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे (Online Shopping Fraud).

लॉकडाऊनमध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता ऑनलाईन खरेदीतही गंडा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. दिवाळी म्हणजे प्रत्येकाच्या आनंदाचा क्षण आहे. अनेकजण या सणाला खरेदी करत असतात. सध्या ऑनलाईन खरेदीवर ही अनेकांचा भर आहे. पण आता ऑनलाईन खरेदी करताना सावधान राहणे तेवढे च गरजेचे आहे. अन्यथा तुमचीही फसवणूक होण्याची शक्यता आहे.

Online Shopping Fraud

संबंधित बातम्या :

सावधान! नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक, वसईत दोन लाखांचा गंडा

नागपुरात 41 लाखांची ऑनलाईन फसवणूक, चार नायजेरियनसह एका भारतीयाला अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.