AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBM 6: जास्त मतं मिळूनही रुचिता घराबाहेर; बिग बॉसच्या निर्णयावर धनंजय पोवार स्पष्टच म्हणाला..

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातून रुचिता जामदार एलिमिनेट झाली आहे. यावर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. रुचिता ही बिग बॉसच्या घरातील सर्वांत चर्चेतली स्पर्धक होती. तिला सर्वाधिक मतं मिळाल्याचा दावा माजी स्पर्धकाने केला आहे.

BBM 6: जास्त मतं मिळूनही रुचिता घराबाहेर; बिग बॉसच्या निर्णयावर धनंजय पोवार स्पष्टच म्हणाला..
Ruchita Jamdar and Dhananjay PowarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2026 | 12:07 PM
Share

‘बिग बॉस मराठी 6’चा खेळ सध्या चांगलाच रंगत असून दर आठवड्यात त्यात नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी सर्वांत चर्चेतली स्पर्धक रुचिता बिग बॉसच्या घरातून बाद झाल्याचं कळतंय. खरंतर रुचिता टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपलं स्थान पक्कं करेल, अशी चर्चा असताना आता तिच्या एलिमिनेशनमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक धनंजय पोवारने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे काही पटलेलं नाही, असं लिहित त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार?

“बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर पहायला मिळालं की रुचिता बाहेर पडली. पण मला असं वैयक्तिक वाटतंय की याच्या आधी रोशन भजनकरला खूप मतं मिळाली होती. तरीही रोशन बिग बॉसच्या घराबाहेर पडला. आता रुचिताला खूप मतं मिळाली होती, असं मला कळतंय. कारण रुचिता कंटेंट देतेय. मागचा पूर्ण आठवडा तिने बिग बॉसला कंटेंट दिला होता. मग तरीही रुचिता बाहेर गेली,” अशा शब्दांत त्याने आश्चर्य व्यक्त केला आहे.

एलिमिनेशननंतर रुचिताची पोस्ट

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने लिहिलंय, ‘बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले, तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार.’

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच