AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिले ओळख मग शारीरिक संबंध; 43 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्यासोबत नको ते घडलं, शेवटी…

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने मॅट्रिमोनियल वेबसाइट्सचा वापर करुन 43 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर जे झालं ते ऐकून अनेकांना धक्का बसला.

पहिले ओळख मग शारीरिक संबंध; 43 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्यासोबत नको ते घडलं, शेवटी...
क्राईमImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 08, 2026 | 12:03 PM
Share

आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी मॅट्रिमोनियल वेबसाइट्सचा वापर करणाऱ्यांसाठी आता हे प्लॅटफॉर्म धोक्याचे ठिकाण बनले आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लग्नाचे आमिष दाखवून सुशिक्षित तरुण-तरुणींना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गेल्या सहा महिन्यांत (सप्टेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६) या भागात ३० ते ३५ मोठे गुन्हे दाखल झाले असून, फसवणुकीची रक्कम काही लाखांपासून ते साडेतीन कोटींपर्यंत पोहोचली आहे.

फसवणुकीचा क्रूर प्रकार

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील ४३ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झालेल्या महिलेने जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. ओळख झाल्यानंतर संबंध प्रस्थापित झाले आणि नंतर महिलेने बलात्काराची खोटी धमकी देऊन त्याच्याकडून ४२.८७ लाख रुपये उकळले. भीतीने ग्रासलेल्या तरुणाने कर्ज काढले, बहिणीचे सोने गहाण ठेवले आणि रोख व ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे ही रक्कम दिली. अखेर मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच प्रकारे अनेक महिला आणि पुरुषांना ‘एनआरआय’, ‘डॉक्टर’, ‘सीईओ’ किंवा ‘इंजिनिअर’ असल्याचे सांगून फसवले जात आहे. गुन्हेगार बनावट प्रोफाइल तयार करतात, महागड्या भेटवस्तूंचे आमिष दाखवतात, कस्टम ड्यूटी किंवा इतर खोट्या कारणांसाठी पैसे मागतात. काही प्रकरणांत ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून किंवा खोट्या बलात्कार/ब्लॅकमेलच्या धमक्या देऊन कोट्यवधींची उकळणी केली जाते.

कोणाला लक्ष्य केले जाते?

सायबर गुन्हेगार मुख्यतः आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणी, घटस्फोटित महिला, विधवा आणि उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना टार्गेट करतात. हे भामटे स्वतःला परदेशातील रहिवासी किंवा उच्चपदस्थ व्यक्ती म्हणून भासवतात आणि भावनिक संबंध जोडून विश्वास संपादन करतात.

पोलिसांचे आवाहन आणि सावधगिरी

पुणे सायबर सेलने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार टाळावेत. पैशांची मागणी झाल्यास तात्काळ १९३० (सायबर क्राइम हेल्पलाइन) किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. जोडीदार निवडताना घाई करू नये. व्यक्तीची ओळख, नोकरी, कुटुंब आणि पार्श्वभूमीची पूर्ण खात्री करून घ्यावी. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जागरूकता आणि सावधगिरी हीच सर्वोत्तम उपाय आहे.

Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?