शबरीमला मंदिर सात महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं, नव्या पुजाऱ्यांची नियुक्ती

| Updated on: Oct 17, 2020 | 7:54 PM

केरळमधील सबरीमाला मंदिर शनिवारपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. तब्बल सात महिन्यांनंतर पाच दिवसांच्या मासिक पूजनाच्या कार्यक्रमासाठी हे मंदिर उघडण्यात आलं आहे.

शबरीमला मंदिर सात महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं, नव्या पुजाऱ्यांची नियुक्ती
Follow us on

कोची : केरळमधील शबरीमला मंदिर (Sabarimala Temple) शनिवारपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. तब्बल सात महिन्यांनंतर पाच दिवसांच्या मासिक पूजनाच्या कार्यक्रमासाठी हे मंदिर उघडण्यात आलं आहे. यादरम्यान ज्या भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जायचं असेल त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या तोंडावर फेस मास्क आणि कोव्हिड-19 चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Sabrimala temple reopens for devotees after seven months with covid-19 Protocol, new priests Appointed in temple)

दररोज या मंदिरात केवळ 250 भाविकांना प्रवेश दिला जाईल, आज 246 भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी केली. 10 ते 60 वर्षांपर्यंत वयाच्या लोकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ध्यानात ठेवून मंदिर प्रशासनाने कडक नियम बनवले आहेत. तसेच त्यांची अंमलबाजवणीदेखील होत आहे.

ज्या भाविकांकडे कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे कोणतेही प्रमाणपत्र नसेल, अशा भाविकाला जवळच्या नीलकमल बेस कॅम्पमध्ये रॅपिड अँटिजन चाचणी करावी लागेल. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच त्या भाविकाला मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाईल.

दरम्यान, लवकरच मंदिरात अनुष्ठान केले जाणार आहे. अनुष्ठानासाठी ‘नव्यभिषेकम’ (तुपाचा अभिषेक) आणि ‘अन्नदानम’ (अन्नदान करण्याची पवित्र परंपरा) केले जाईल. अनुष्ठानादरम्यान कोव्हिड-19 बाबतच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंदिर प्रवेशासाठी प्रत्येक भाविकाकडे फिटनेस प्रमाणपत्र असायला हवे. हे प्रमाणपत्र जास्तीत जास्त 48 तासांपूर्वीपर्यंत काढलेलं असायला हवं. देशात कोरोनाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीपर्यंत शबरीमला मंदिरात दर्शनासाठी जाणारे भाविक स्नानासाठी जवळच्या पम्बा नदीवर जात होते, परंतु भाविकांना तिथे जाऊ दिले जात नाही.

नव्या पुजाऱ्यांची नियुक्ती

व्ही. के. जयराजन यांची अय्यप्पा मंदिराचे ‘मेलासांथी’ (मुख्य पुजारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी ते पदग्रहण करतील त्यानंतर पुढील एक वर्ष ते या पदावर राहतील. राजी कुमार एम. एन. नम्बूदिरी यांची जवळच्या मलिकाप्पुरम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Breaking | अहमदनगरमध्ये भाजपकडून तुळजाभवानी मंदिर उघडून घटस्थापणा, मंदिरात भाविकांना येण्याचे आवाहन

तुळजापुरात पहिल्याच दिवशी प्रवेशबंदीचं उल्लंघन, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी

मंदिरात जाणारे भक्त लाखो, दारुच्या दुकानात रांगेतून प्रवेश, अमृता फडणवीसांना विद्या चव्हाणांचे उत्तर

(Sabrimala temple reopens for devotees after seven months with covid-19 Protocol, new priests Appointed in temple)