सलमान खानला धक्का, ‘भारत’ दुसऱ्याच दिवशी लीक

| Updated on: Jun 06, 2019 | 3:16 PM

सलमान खानचा 'भारत' हा सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला. यामुळे सलमान खानसह सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.

सलमान खानला धक्का, ‘भारत’ दुसऱ्याच दिवशी लीक
Follow us on

मुंबई : अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा ईदला प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतंकच नाही तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड बनवेल असंही म्हटलं जात आहे. मात्र, यासर्वांमध्ये प्रदर्शित होताच हा सिनेमा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बातमीने सिनेमा निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो.

इंड‍यन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या ‘भारत’ला हॅकिंगसाठी बदनाम असलेली वेबसाईट तामिळ रॉकर्सने लीक केलं आहे. ऑनलाईन लीकच्या या घटनेने ‘भारत’च्या निर्मात्यांना मोठं नुकसान होऊ शकतं. सलमानचा हा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च करणात आले आहेत. ‘भारत’ सिनेमावर विश्वचषक सामन्यांचाही परिणाम होणार आहे. आता हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांच्या संकटांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

फिल्म पायरसीवर सलमानने पूर्वीही चिंता व्यक्त केली होती. हा सिनेमा तेव्हा 300 कोटी कमावेल जेव्हा तो सिनेमागृहांमध्ये बघितला जाईल, असं ‘भारत’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खान म्हणाला होता.

तामिळ रॉकर्सने यापूर्वीही अनेक बडे सिनेमे ऑनलाईन लीक केले आहेत. या वेबसाईटविरोधात अनेक तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक काळापासून सिनेमा प्रदर्शित होताच तो लीक होऊन जातो. त्यामुळे सिनेमांच्या कमाईवर मोठा परिणाम होतो आहे.

‘भारत’मध्ये सलमान पहिल्यांदाज वृद्धाच्या भूमिकेत

‘भारत’ या सिनेमात सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सलमान-कतरिनाचा सोबतचा हा सहावा सिनेमा आहे. या सिनेमात सलमान खान 17 वर्षांच्या तरुणापासून ते 60 वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा कोरियन सिनेमा ‘अॅन ऑड टू माय फादर’ चा रिमेक आहे. अतूल अग्निहोत्रीच्या रील लाईफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड आणि भूषण कुमारच्या टी-सीरीजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमाही सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणे ईदला म्हणजेच 5 जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री तब्बू, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटाणी, अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता सुनील ग्रोवरही दिसणार आहेत.

हा सिनेमा प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 70 देशात एकूण 5300 स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला.