...म्हणून यापुढे कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही : दिशा पटाणी

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली दिशा पटाणी लवकरच सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 5 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. मात्र भारत या चित्रपटानंतर ‘मी पुन्हा कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही’, अशी खंत दिशाने व्यक्त केली आहे. …

...म्हणून यापुढे कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही : दिशा पटाणी

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली दिशा पटाणी लवकरच सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 5 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. मात्र भारत या चित्रपटानंतर ‘मी पुन्हा कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही’, अशी खंत दिशाने व्यक्त केली आहे. नुकतंच ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिशाने मुलाखत दिली. या मुलाखतीत दिशाने हा खुलासा केला आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना भारत चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. येत्या 5 जूनला म्हणजे ईद दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, तब्बू आणि दिशा पटानी या तीन अभिनेत्री दिसणार आहेत. या चित्रपटात दिशाने सलमानसोबत ‘स्लो मोशन’ या गाण्यात काम केलं आहे. सध्या हे गाण फार ट्रेंड होत असून या गाण्याला युट्यूबवर लाखो हिट्स मिळाले आहेत. या गाण्यानंतर प्रेक्षक या दोघांना पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. मात्र सलमानसोबत दिशाचा हा चित्रपट पहिला आणि शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. मुंबई मिररच्या मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे.

सलमान सरांचे वय माझ्यापेक्षा जास्त आहे. या चित्रपटात त्यांनी 20-30 वर्षाच्या तरुणाचा रोल केला आहे.  त्यामुळे मला ही संधी मिळाली. मात्र यानंतर मला पुन्हा कधी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल की नाही याबाबत मला शंका आहे, असे दिशाने मुलाखतीदरम्यान सांगितले. या कारणामुळे कदाचित आमची जोडी प्रेक्षकांना यापुढे कधीच दिसणार नाही, अशी खंतही व्यक्त केली.

पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, सलमान खान आता ‘असा’ दिसतो?

भारत चित्रपटाबाबत बोलताना, “मला दिग्दर्शक अली सर यांनी मला पाहुणी कलाकार म्हणून बोलवलं होतं. मला त्यांनी दिलेला रोल आवडला, म्हणून मी त्या रोलसाठी लगेच होकार कळवला आणि अशाप्रकारे मला सलमान सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली”, असे तिने सांगितले. विशेष म्हणजे भारत चित्रपटाची स्क्रिप्ट समजून घेतानाही अली सरांनी सुद्धा मला हीच गोष्ट सांगितली होती, असेही तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 

#OnLocation #Memories #Bharat #SlowMotionSong @bharat_thefilm @beingsalmankhan @dishapatani

A post shared by Atul Agnihotri (@atulreellife) on

दिशाला मुलाखतीदरम्यान सलमान कसा आहे? असा प्रश्न विचारला असता, तिने सलमान खूप मेहनती माणूस आहे. चित्रपटादरम्यान मी सलमान सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकले. माझी आणि त्यांची खूप चांगली मैत्री झाली आहे. सलमान सरांशी इतक्या चांगल्या मैत्रीची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. असे तिने सांगितले. त्याशिवाय भारत चित्रपटाची संधी दिल्याबद्दल मी दिग्दर्शक अली अब्बास यांचेही आभारी आहे, असेही तिने म्हटले.

2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या टी सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *