सांगली महापालिकेची बैठक बोलवून प्रलंबित कामं मार्गी लावणार, जयंत पाटील यांचे आश्वासन

| Updated on: Oct 25, 2020 | 4:31 PM

सांगली शहरातील प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी लवकरच महानगरपालिकेची बैठक बोलावणार असल्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

सांगली महापालिकेची बैठक बोलवून प्रलंबित कामं मार्गी लावणार, जयंत पाटील यांचे आश्वासन
Follow us on

सांगली : शहरातील सर्व प्रलंबित कामं  तसेच कुपवाड ड्रिनेजचा प्रस्ताव, शेली नाल्याचं काम मार्गी लावण्यासाठी लवकरच महानगरपालिकेची बैठक बोलावणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. ते मिरज येथे सांगली महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. (Jayant Patil on pending work of Sangli Municipal Corporation)

कार्यक्रमात सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी जयंत पाटील यांना प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी लक्ष घालण्याचं आवाहन केलं. त्याला तत्काळ प्रतिसाद देत जयंत पाटील म्हणाले, “सांगलीतील भाजप नेते मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार यांच्यावर माझं फार प्रेम आहे. कदाचित त्या दोघांनी सांगितल्याप्रमाणेच महापौर यांनी मला मदतीसाठी आहवान केले आसावे. कोण मंत्री होतं आणि कुणाचं राज्य आहे, हे महत्त्वाचं नसतं. मात्र, पक्षीय विषय बाजूला ठेवून लोकांची कामं करणं गरजेचं असतं. महापौर गीता सुतार यांनी केलेल्या आहवानानुसार मी लवकरच महापालिकेत बैठक घेऊन प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल.” तसेच कुपवाड ड्रिनेजचा प्रस्ताव, शेली नाल्याचं काम यांचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आवठड्यात बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारी रुग्णालये जास्त विश्वासार्ह, म्हणूनच फडणवीस सरकारी रुग्णालयात दाखल

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लगण झालेली आहे. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “सरकारी रुग्णालयांची विश्वासार्हता जास्त असते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस अनुभवी असतात. या सर्व गोष्टी फडणवीसांना माहिती आहेत. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयात दाखल झाले असावेत. त्यांचा निर्णय योग्य़ आहे.”

पंचनामे हातात येताच शेतकऱ्यांना मदत

कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अतिवृष्टीच्या नुकसानी बाबत विचारले असता त्यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल असे सांगितले. ते म्हणाले “सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. पंचनामे चालू आहेत. नुकसानीचे पंचनांमे झाले की शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत केली जाईल.”

संबंधित बातम्या : ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’, हे मला समजलं नाही, पण त्यांना ‘टायगर अभी जिंदा है’ हे कळालं असेल- जयंत पाटील

Jayant Patil | ताकद काय असते हे दाखवायला जळगावमध्ये जावं लागेल : जयंत पाटील

शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? जयंत पाटील म्हणतात…

(Jayant Patil on pending work of Sangli Municipal Corporation)