शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? जयंत पाटील म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.

शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? जयंत पाटील म्हणतात...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काय निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बैठकीत काय निर्णय झाले याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आगामी काळात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे, बाळासाहेब पाटील आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते (Jayant Patil comment on meeting with Sharad Pawar and Supriya Sule).

जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या विभागातील नेत्यांना बोलावून चर्चा करण्यासाठी आज प्राथमिक बैठक झाली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची सोमवारी किंवा मंगळवारी चर्चा होणार आहे. सुभाष देसाई आणि बाळासाहेब थोरात या दोघांशीही मी चर्चा करणार आहे. आमची बैठक ठरलेली आहे. 3 पदवीधरच्या जागा आहेत आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहेत. त्याचं वाटप कसं होणार हे आगामी चर्चेतच ठरणार आहे.”

राज्य सरकारचं जितकं उत्पन्न, तितकाच कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च : जयंत पाटलांचं उत्तर

“सरकार पावसातील नकुसानग्रस्तांना निश्चितपणे मदत करणार आहे. आमच्यासमोर काही प्रश्न आहेत. राज्य सरकारचं जितकं उत्पन्न आहे तितकाच कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी निधी उभारणं आणि फार मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. पुढील काही दिवसात हा मदतीचा निर्णय होईल,” अशीही माहिती जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • आम्ही इतर पक्षातील खासदार किंवा आमदार यांना आता येण्यास सुचवत नाही. त्यांना वेळ आल्यावर घेऊ.
  • खडसे यांच्यासोबत त्यांचे समर्थकही आहेत. सध्या खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये.
  • कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरवू नका. या चर्चांना पूर्णविराम दिला तर बरं होईल.़
  • एकदा प्रवेश केल्यावर पक्ष संघटना वाढवण्याबाबत विचार होईल.
  • अजित पवार थोडे आजारी आहेत. सर्दीचा त्रास होत आहे. त्यांना डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. कोरोना झाला का याबाबत नेमकी माहिती नाही.

हेही वाचा :

Jayant Patil comment on meeting with Sharad Pawar and Supriya Sule

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *