नागपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची व्हाईट कॉलर टोळी कार्यरत, भाजप नगरसेवकाचा गंभीर आरोप

| Updated on: Oct 23, 2020 | 12:40 PM

नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. (Serious allegations of misconduct on Nagpur Municipal officer By BJP Corporator)

नागपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची व्हाईट कॉलर टोळी कार्यरत, भाजप नगरसेवकाचा गंभीर आरोप
Follow us on

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. मनपात भ्रष्टाचाराची व्हाईट कॉलर टोळी आहे, असा आरोप विधी सभापती धम्मपाल मेश्राम यांनी केला आहे. धम्मपाल मेश्राम यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा एजन्सीजला चुकीच्या पद्धतीनं निविदा देण्यात आल्या, असाही आरोप धम्मपाल मेश्राम यांनी केला आहे. (Serious allegations of misconduct on Nagpur Municipal officer By BJP Corporator)

‘नागपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची व्हाईट कॉलर टोळी आहे’ असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि विधी समितीचे सभापती अँड धम्मपाल मेश्राम यांनी केला आहे. मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर हे गंभीर आरोप केले आहेत.

कागदपत्र असलेल्या सुरक्षा एजन्सीला कंत्राट देणे, आरक्षण आणि पदोन्नतीत घोळ, दरवर्षी 50 लाख रुपयांच्या स्टेशनरीत गैरप्रकार, अशाप्रकारचे गंभीर आरोप धम्मपाल मेश्राम यांनी केले आहेत. ‘मनपात भ्रष्टाचाराची व्हाईट कॉलर टोळी आहे. त्यामुळे या गैरप्रकाराची चौकशी करावी. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Serious allegations of misconduct on Nagpur Municipal officer By BJP Corporator)

संबंधित बातम्या :

धक्कादायक! टेरेसवर कॉफी पित असताना अंगावर वीज पडली, मुंबईत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना