उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना

उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्येचं सत्र सुरुच आहे. रेल्वे अपघातात गेल्या २१ महिन्यात तब्बल ५०० जणांना मृत्यू झालाय. तर शहरात गेल्या चार दिवसात हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत.

उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्यांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे अपघातात गेल्या २१ महिन्यात तब्बल ५०० जणांना मृत्यू झालाय. नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ७९ जणांनी आपले प्राण गमावले. तर रेल्वेतून पडून १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेसमोर आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रेल्वेसमोर उडी मारुन 44 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर १३ जणांचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडून मृत्यू झाला आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेली ही माहिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळं नागपूर लोहमार्ग पोलिसांनी हे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. (Railway accident and murder season in Nagpur)

नागपुरात हत्येचं सत्र सुरुच, गृहमंत्री आहेत कुठे?

रेल्वे अपघाताबरोबरच उपराजधानी नागपुरात हत्येचं सत्रही थांबताना दिसत नाही. शहरात गेल्या चार दिवसात हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. जानेवारी 2020 पासून नागपूर शहरात हत्येच्या तब्बल 77 घटना घडल्या आहेत. तर गेल्या वर्षी नागपुरात 90 जणांची हत्या झाली होती. यामध्ये सर्वाधिक हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील सरकारच्या काळात नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. तरीही नागपुरात दिवसाढवळ्या खून व्हायचे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री विदर्भाचेच असले तरीही नागपुरातील हत्येचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. नागपुरातील गुंडगिरी संपवायची असल्यास गृहमंत्री आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज सर्वसामान्य नागपूरकर व्यक्त करत आहेत.

बहिणीची छेड काढली म्हणून भावाकडून तडीपार गुंडाची हत्या

बहिणीची छेड काढली म्हणून भावानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं एका तडीपार गुंडाची हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. उप्पलवाडीतील विटभट्टी चौकात ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहेत. तर रविवारीच हत्येची दुसरी घटना यशोधरानगर मधील बिनाकी इथं घडली होती. रविवारी रात्री दोन तासांत खुनाच्या दोन घटना घडल्यानं नागपूर हादरलं होतं.

संबंधीत बातम्या:

नागपूर दुहेरी हत्याकांडानं हादरलं, आरोपी जयंत नाटेकरला अटक

नागपूरमध्ये बलात्कारानंतर चिमुकलीची हत्या, संतप्त नागरिकांची बंदची हाक

Railway accident and murder season in Nagpur

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *