AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW : पिंक बॉल टेस्ट सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने नमवलं

IND W vs AUS W Pink-ball Test:भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला.

INDW vs AUSW : पिंक बॉल टेस्ट सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने नमवलं
INDW vs AUSW : पिंक बॉल टेस्ट सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने नमवलंImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Mar 08, 2026 | 3:06 PM
Share

IND W vs AUS W Pink-ball Test: पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात पूर्णपणे ऑस्ट्रेलियाचं वर्चस्वस दिसलं. दुसरीकडे, भारताची बॅटिंग पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून आलं. हा कसोटी फक्त 3 दिवसात संपला. यावरून भारतीय संघाच्या कामगिरीचा अंदाज येतो. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 323 धावा केल्या आणि पहिल्या डावात 125 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना भारतीय संघाची दाणादाण उडाली. भारातने 149 धावा केल्या. म्हणजेच दुसऱ्या डावात 24 धावा आल्या आणि 25 धावांचं विजयी लक्ष्य ठेवलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता पूर्ण केलं.

या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही खूप चांगली सुरुवात केली. टी20 मध्ये खूप चांगले क्रिकेट खेळलो आणि दुर्दैवाने त्यानंतर आम्ही तशी कामगिरी पुढे ठेवू शकलो नाही. पण मला वाटते की ही एकंदरीत चांगली मालिका होती. ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा मला खूप आनंद झाला आणि मला वाटते की ही एक उत्तम लढत होती.भविष्यातही आम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धा मिळत राहतील कारण यामुळे तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो आणि मला वाटते की कसोटी क्रिकेट ही अशी गोष्ट आहे जी आपण सर्वांना खरोखर खेळायची आहे आणि गुलाबी चेंडू ही एक आव्हानात्मक गोष्ट होती आणि आशा आहे की भविष्यातही आपल्याला अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल.’

कर्णधार हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, ‘मला माहित आहे की आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता, पण मला खात्री आहे की भविष्यात आम्ही त्यांना अभिमान वाटेल आणि आशा आहे की आम्ही भविष्यात चांगले क्रिकेट खेळू.’ तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली म्हणाली की, ‘त्या प्रयत्नांमुळे खरोखरच आनंद झाला. टी20 मालिकेतून परतताना, मला असे वाटते की गटात येताना थोडी निराशा आणि थोडी अनिश्चितता होती. पण मला वाटते की त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि शेवटच्या चार सामन्यांमध्ये बाहेर येऊन खेळले ते अविश्वसनीय आहे आणि मला खरोखर अभिमान आहे आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा मला खूप आनंद आहे.’

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!