मुलाचा आईवरच बलात्कार, सातारा जिल्ह्यातील संतापजनक घटना

सातारा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. मुलाने जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या एका गावात घडलाय. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केलं. या घटनेमुळे वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय. भुईंज पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम […]

मुलाचा आईवरच बलात्कार, सातारा जिल्ह्यातील संतापजनक घटना
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

सातारा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. मुलाने जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या एका गावात घडलाय. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केलं. या घटनेमुळे वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय. भुईंज पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधम मुलाची आई आणि वडील एका लग्नासाठी गावात गेले होते. तेथील गावदेव करून झाल्यावर आरोपीची आई एकटीच घरी पुढे आली. यावेळी तिचा मुलगा हा घराच्या ओट्यावर बसला होता. आई घरात गेल्यानंतर तोही घरात गेला आणि त्याने आतून कडी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्‍वतःच्या आईवरच बलात्कार केला.

आईने आरडाओरडा केला आणि शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली. वडिलांनी मुलाला केलेल्‍या कृत्‍याचा जाब विचारल्यावर मुलाने वडिलांनाही दगड मारून जखमी केलं. घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात स्‍वत:च्या मुलाने केलेल्‍या या घृणास्‍पद कृत्‍याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.