पालघरमध्ये भरधाव एसटीचा अपघात, 50 विद्यार्थी जखमी

| Updated on: Aug 13, 2019 | 10:06 AM

पालघरमधील वाडा येथे महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील तब्बल 50 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पिवळी गावातून वाडाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

पालघरमध्ये भरधाव एसटीचा अपघात, 50 विद्यार्थी जखमी
Follow us on

पालघर : पालघरमधील वाडा येथे महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील तब्बल 50 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पिवळी गावातून वाडाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या 50 विद्यार्थ्यांवर सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पालघरमधील पिवळी या गावातून वाडाच्या दिशेने मंगळवारी सकाळी 6.30 वाजता ही एसटी बस निघाली होती. यावेळी या बसमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर काही शाळांमधील विद्यार्थी प्रवास करत होते. एसटी भरधाव वेगात पिवळी गावातून वाडाकडे जात असताना जांभूळ पाडा येथे गतिरोधकावर आदळली. या धडकेत वाहनचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरुन हा अपघात झाला, अशी माहिती प्रवासी विद्यार्थ्यांनी दिली.

या अपघातात तब्बल 50 विद्यार्थी जखमी झाले. या विद्यार्थ्यांना तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनेक विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले आहे, तर अनेकांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

संबंधित बातम्या :

स्वतःच्याच घरात चोरी, भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला, घरमालक अटकेत!

पाण्याच्या बादलीत पडून नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

तब्बल 9 लाख लोकांनी मुंबई सोडली!

मेट्रो कर्मचाऱ्याची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या, व्हिडीओ पाहून मित्राला धक्का