UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना महिन्याला 26 हजार मिळणार

| Updated on: Nov 17, 2020 | 7:53 PM

यूपीएससीची मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातींमधील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना महिन्याला 26 हजार मिळणार
Follow us on

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य करण्याची योजना या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 12 हजार रुपये विद्यावेतन आणि पुस्तक खरेदीसाठी 14 हजार रुपये असे एकूण 26 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी (K C Padvi) यांनी दिली आहे. (students from Scheduled Tribes are preparing for UPSC main exam and interview will get financial assistance : K C Padvi)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री के. सी. पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या 25 अशा अनुसूचित जमातीमधील एकूण 50 उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.

ही योजना 2020-21 पासून लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि प्रशासकीय अधिकारी व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास मंत्री पाडवी यांनी व्यक्त केला आहे.

यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस- IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस – IFS), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस- IPS)आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते.

संबंधित बातम्या

UPSC : हिंगोलीतील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला यूपीएससीत मोठं यश, देशात 574 वा क्रमांक

बारावीला गणित विषयात नापास, यूपीएससीत देशात 261 वी रँक

(students from Scheduled Tribes are preparing for UPSC main exam and interview will get financial assistance : K C Padvi)