बारावीला गणित विषयात नापास, यूपीएससीत देशात 261 वी रँक

नाशिक : दहावी, बारावीला नापास झाल्यानंतर अनेक जण निराश होतात, न्यूनगंड बाळगतात. पण काही अशी उदाहरणं असतात, जी या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत राहतात आणि पुढे चालतात. नाशिकमधील सय्यद रियाज अहमद हा तरुणही असंच उदाहरण आहे. बारावीला गणित विषयात नापास झालेल्या रियाजने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत देशात 261 वी रँक मिळवली आहे. रियाजला …

बारावीला गणित विषयात नापास, यूपीएससीत देशात 261 वी रँक

नाशिक : दहावी, बारावीला नापास झाल्यानंतर अनेक जण निराश होतात, न्यूनगंड बाळगतात. पण काही अशी उदाहरणं असतात, जी या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत राहतात आणि पुढे चालतात. नाशिकमधील सय्यद रियाज अहमद हा तरुणही असंच उदाहरण आहे. बारावीला गणित विषयात नापास झालेल्या रियाजने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत देशात 261 वी रँक मिळवली आहे. रियाजला आयएएस मिळणं जवळपास निश्चित आहे.

न्यूनगंड न बाळगता आपण पुढे गेलो तर यशापासून कुणीही रोखू शकत नाही, असं रियाजने सांगितलं. विशेष म्हणजे रियाजने यातून पालकांनाही आवाहन केलंय. मुलं नापास झाल्यानंतर पालकही त्यांच्यासोबत खचून जातात किंवा मुलांना झापतात. पण मुलांना मानसिकदृष्ट्या साथ दिली तर काय होऊ शकतं, याचं उदाहरण रियाजच्या पालकांनी घालून दिलंय.

पाचव्या प्रयत्नात यश मिळालं

रियाजने यूपीएससीची तयारी दिल्लीत केली. पहिल्या दोन प्रयत्नात पूर्व परीक्षाही पास होता आली नाही. पण जिद्द कमी झालेली नव्हती. तिसऱ्या प्रयत्ना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास होत मुलाखतीपर्यंत मजल मारली. पण त्यावेळी अवघ्या काही गुणांवरुन यशाने हुलकावणी दिली. पुन्हा नव्याने लढा सुरु केला. पण चौथ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र न ठरल्याने निराशा पदरी पडली. पण पाचव्या प्रयत्नात अखेर यश मिळवलं.

“भाषा ही अडचण नसते”

मराठीत शिक्षण झालेल्या मुलांसाठी भाषा हा सर्वात मोठा अडथळा असतो. रियाजचं ग्रॅज्युएशन बीएसस्सी केमिस्ट्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एमएसस्सी ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये झालं होतं. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी इंग्रजीची अडचण आली नाही. पण मुलाखत ही हिंदीतच दिली. त्यामुळे मुलाखतीसाठी इंग्रजीच लागते, असं काही नाही. यूपीएससीची तयारी करताना भाषा ही अडचण नाही, असं रियाजचं म्हणणं आहे. अनेक महत्त्वाची पुस्तकं, नोट्स या मराठीत उपलब्ध नसतात. त्यामुळे मुलांची अडचण होते. पण थोडीशी मानसिक तयारी या सर्व गोष्टींवर मात करु शकते, असं रियाजने सांगितलं.

“स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करा, कमीत कमी पुस्तकं वाचा”

यूपीएससीची तयारी करताना अनेक मुलं टॉपर्सची स्ट्रॅटेजी फॉलो करतात. पण स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करुन यश मिळवण्याचा आनंद वेगळाच असतो, असं रियाज सांगतो. कारण, प्रत्येकाची अभ्यास करण्याची क्षमता वेगवेगळी असते. यावर्षीची पूर्वपरीक्षा 40 दिवसांवर आहे. त्यामुळे कमीत कमी पुस्तकं वाचून, आतापर्यंत जे वाचलंय त्यावरच लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला रियाजने दिलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *