प्रभाकर येडलेंच्या आठवणीने सनी लिओनी ढसाढसा रडली

मुंबई : अभिनेता अरबाज खानचा ‘पिंच’ हा टॉक शो बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रसिद्ध आहे. या टॉक शोमध्ये नुकतंच अरबाज खानने अभिनेत्री सनी लिओनीला आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सनी लिओनी अक्षरश: ढसाढसा रडली. या लाईव्ह टॉक शोमध्ये अरबाजने सनीला एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत विचारले असता, सनीने रडायला सुरुवात केली. सनी लिओनी आपला मित्रपरिवार आणि कर्मचाऱ्यांबाबत खूप हळवी असल्याची […]

प्रभाकर येडलेंच्या आठवणीने सनी लिओनी ढसाढसा रडली
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

मुंबई : अभिनेता अरबाज खानचा ‘पिंच’ हा टॉक शो बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रसिद्ध आहे. या टॉक शोमध्ये नुकतंच अरबाज खानने अभिनेत्री सनी लिओनीला आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सनी लिओनी अक्षरश: ढसाढसा रडली. या लाईव्ह टॉक शोमध्ये अरबाजने सनीला एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत विचारले असता, सनीने रडायला सुरुवात केली.

सनी लिओनी आपला मित्रपरिवार आणि कर्मचाऱ्यांबाबत खूप हळवी असल्याची बाब अनेकदा पडद्यासमोर आली आहे. ‘पिंच’ या टॉक शोमध्ये एका सोशल मीडिया युजरने सनीला प्रभाकर येडले या कर्मचाऱ्याबाबत प्रश्न विचारला. ‘सनीने 1.38 कोटी रुपयांची गाडी खरेदी केली. मात्र प्रभाकर येडले हे तिच्या कंपनीतील कर्मचारी आजारी असताना त्यांच्यावर उपचारासाठी सनीने 20 लाख रुपये का दिले नाहीत? असा प्रश्न एका सोशल मीडिया युजरने सनीला विचारला.

Loading...

त्या सोशल मीडिया युजर्सचा प्रश्न ऐकून सनीला धक्का बसला. विशेष म्हणजे प्रभाकर येडले या कर्मचाऱ्याचे नाव ऐकताच सनीने लाईव्ह शो मध्ये रडायला सुरुवात केली. त्यानंतर सनीने त्या सोशल मीडिया युजर्सच्या प्रश्नाला चांगलेच उत्तर दिले.

“प्रभाकर आजारी असताना त्यांच्या रुग्णालयाचा सर्व खर्च मी आणि माझा नवरा डॅनिअल वेबरने केला. तसेच ते रुग्णालयात असताना त्यांच्या दोन्ही किडन्या खराब होत्या, त्यामुळे त्यांना दररोज रक्त बदलावे लागत होते. त्याचाही संपूर्ण खर्च मी दिला, असे सनीने सांगितले.

जेव्हा मला आणि डॅनिअलला प्रभाकरच्या आजाराबाबत समजले तेव्हा आम्हाला खूप त्रास झाला. प्रभाकर आमच्यासोबत कित्येक वर्षांपासून काम करत असल्याने ते माझ्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे होते. त्याशिवाय माझ्या आधीपासून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने, या इंडस्ट्रीतील अनेक लोकांच्या ते चांगले परिचयाचे होते. प्रभाकर हे अतिशय चांगले असल्याने त्यांच्यावर अनेकांचे प्रेम होते. मात्र त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवाराप्रमाणे मलाही धक्का बसला होता.

मात्र माझ्या आणि डॅनियलच्या अथक प्रयत्नानंतरही किडनी निकामी झाल्याने प्रभाकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मलाही दुख: झाले. प्रभाकर गेल्यानंतर त्यांच्या आजराचा संपूर्ण खर्च, रुग्णालयाचे बिल, वकिलाचे बिल हे सर्व मी दिले. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीही मी स्वीकारली आहे असेही सनी म्हणाली.

अरबाज खानने काही महिन्यांपूर्वी पिंच हा टॉक शो सुरु केला. हा टॉक शो क्यू प्ले (QuPLAY) या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होतो. फेसबुक लाईव्हप्रमाणे असणाऱ्या या टॉक शोमध्ये थेट सोशल मीडिया युजर्स कंमेटद्वारे सेलिब्रिटींना प्रश्न विचारु शकतात. या टॉक शोमध्ये करिना कपूर, कतरिना कैफ, सोनम कपूर, करण जोहर यांसारखे अनेक कलाकार आले आहेत.

पाहा व्हिडीओ :

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us