महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा : अजित पवार

| Updated on: Oct 16, 2020 | 5:57 PM

कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा : अजित पवार
Follow us on

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. (DCM Ajit pawar on Mahatma Phule Jan Arogya Yojana)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

“जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. मात्र, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे”, असे आदेश अजित पवार यांनी दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

“मृत्यूदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाकाळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनानी सतर्क राहून कामकाज करावे”, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

(DCM Ajit pawar on Mahatma Phule Jan Arogya Yojana)

संबंधित बातम्या

अशा भेटी होत राहतात, त्यात काही काळबेरं नाही, शिवेंद्रसिंहराजे भेटीवर अजित पवारांचा खुलासा

भाजप आमदार शिवेंद्रराजे अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश