भाजप आमदार शिवेंद्रराजे अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. (BJP MLA Shivendra Raje Bhosale Meet Ajit Pawar at Pune)

भाजप आमदार शिवेंद्रराजे अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

पुणे : साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती. (BJP MLA Shivendra Raje Bhosale Meet Ajit Pawar at Pune)

गेल्या तासाभरापासून शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

संध्याकाळी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमालाही अजितदादा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचा लोकापर्ण सोहळाही पार पडणार आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. एकूण आठ रुग्णवाहिकांचा लोकापर्ण सोहळा अजितदादांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित असतील. (BJP MLA Shivendra Raje Bhosale Meet Ajit Pawar at Pune)

Published On - 9:44 am, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI