PCMC | पिपंरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगेंचा तडकाफडकी राजीनामा, कारण अस्पष्ट

हिंगे यांनी त्यांचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे सोपवला आहे. तुषार हिंगेंनी मुदतीपूर्वी राजीनामा दिल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत. (Tushar Hinge resign)

PCMC | पिपंरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगेंचा तडकाफडकी राजीनामा, कारण अस्पष्ट

पुणे : पिपंरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हिंगे यांनी त्यांचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे सोपवला आहे. तुषार हिंगेंनी मुदतीपूर्वी राजीनामा दिल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत. (PCMC Deputy Mayor Tushar Hinge resign from his post)


पिपंरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. पक्षानं दिलेल्या आदेशानुसार राजीनामा दिल्याचे हिंगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मागील वर्षी 24 नोव्हेंबरला तुषार हिंगे यांची उपमहापौर पदी निवड झाली होती. एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, ते प्रघातानुसार सव्वा वर्ष उपमहापौर पदी राहू शकले असते.

तुषार हिंगे पिपंरी चिंचवड महापालिकेच्या कला आणि सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण बनसोडे यांनी  निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यानं तुषार हिंगेंची बिनविरोध वर्णी लागली होती.

महत्वाच्या बातम्या :

भारतीय व्यापाऱ्यांचा चीनला 40 हजार कोटींचा झटका, दिवाळीला ‘मेड इन चायना’वर बंदी

भाजपचं आंदोलन, राज्यपालांचं पत्र, तरीही ठाकरे सरकार ठाम, देऊळ बंदच!

Live Update : कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात

(PCMC Deputy Mayor Tushar Hinge resign from his post)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *