AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चीनने अखेर मान्य केली भारताची ताकद, युद्ध सुरू असतानाच थेट मोठं वक्तव्य

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून भारताबद्दल मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! चीनने अखेर मान्य केली भारताची ताकद, युद्ध सुरू असतानाच थेट मोठं वक्तव्य
xi jinping Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 4:24 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका केवळ अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांनाच बसत नाहीयेत, तर जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका बसत आहे. या युद्धाच्या तडाख्यामधून भारत, चीन सारखे देश देखील सुटले नाहीये. जर युद्ध आणखी काही दिवस सुरूच राहिलं तर इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती सतावत आहे. दरम्यान एकीकडे युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे आता चीनमधून मोठी बातमी समोर आली आहे. चीनेचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीनमधील सुधारत असलेल्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आणि चीन यांनी एकमेकांचे प्रतिस्पर्धी न बनता एकमेकांचे व्यापारातील भागीदार बनलं पाहिजे, तसेच धोका नाही तर संधी म्हणून विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असं देखील म्हटले आहेत की, भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांचे महत्त्वपूर्ण शेजारी देश आहेत. दोन्ही देश ग्लोबल साऊथचे सदस्य असून, दोन्ही देशांचे खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक अशा स्वरुपाचे सामायिक हितसंबंध आहेत. ते बीजिंगमध्ये आयोजित 14 व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भारत चीन संबंधांवर बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मोठं विधान केलं आहे. भारत आणि चीनच्या संबंधांवर बोलताना त्यांनी म्हटलं की भारत आणि चीन हे एक महत्त्वाचे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांमध्ये खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक अशा स्वरुपाचे सामायिक हितसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेला परस्पर विश्वास, भागीदारी हे एकमेकांच्या विकासासाठी पुरक असल्याचं यावेळी वांग यी यांनी म्हटलं आहे. मात्र दोन्ही देशांमधील संघर्ष आणि प्रतिस्पर्धा ही आशिया खडांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली होती. या भेटीमुळे आता भारत आणि चीनचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या व्यापाराने आता एक नवी उंची गाठली आहे, असंही यावेळी चीनने म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला