IPL 2020 | या 5 खेळाडूंकडून धडाकेबाज कामगिरी, लवकरच भारतीय संघात समावेशाची शक्यता

| Updated on: Jan 16, 2021 | 3:45 PM

आयपीएल (IPL 2020) चा हंगाम कमालीचा उत्कंठावर्धक होता. अनेक युवा बॅट्समन आणि बॉर्लसने आपल्या कामगिरीने क्रिकेट रसिकांना भुरळ घातली.

IPL 2020 |  या 5 खेळाडूंकडून धडाकेबाज कामगिरी, लवकरच भारतीय संघात समावेशाची शक्यता
Follow us on

मुंबई : आयपीएल (IPL 2020) चा हंगाम कमालीचा उत्कंठावर्धक होता. अनेक युवा बॅट्समन आणि बॉर्लसने आपल्या कामगिरीने क्रिकेट रसिकांना भुरळ घातली. या हंगामात विशेष करुन युवा 5 खेळाडूंनी कमाल केली. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने त्यांनी प्रतिस्पर्धी टीमच्या आशा-आकाक्षांना सुरुंग लावला. लवकरच त्यांचा भारतीय संघात देखील समावेश केला जाऊ शकतो. (Top 5 young Player Of IPL 2020 Who Can Enter in indian team).

देवदत्त पडीक्कल (devdutt Padikkal)

देवदत्त पडीक्कलने आपल्या बॅटिंगने आरसीबीच्या (RCB) चाहत्यांच्या मने जिंकली. ओपनिंगला येऊन त्याने आरसीबीसाठी अनेक यादगार इनिंग खेळल्या. या हंगामात 15 मॅचमध्ये 31.53 च्या सरासरीने 473 धावा करताना त्याने 5 अर्धशतके लगावली. या हंगामात पडीक्कलचा स्ट्राईक रेट 124. 80 एवढा होता. ओपनिंगला येत असल्याने पहिल्या पॉवरप्लेमध्ये प्रतिस्पर्धी बॉर्लर्सवर पडीक्कल तुटून पडायचा. एकूणच क्रिकेट रसिकांबरोबरच निवड समितीचं देखील पडीक्कलने लक्ष वेधून घेतलं.

राहुल तेवतिया (Rahul Tewatiya)

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळलेल्या राहुल तेवतियाने आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांची मने जिंकली. खास करुन 31 बॉल्समध्ये 53 रन्सची त्याची इनिंग प्रेक्षकांच्या सदैव आठवणीत असेल. त्याने 14 मॅचमध्ये 255 धावा केल्या. धावा जरी कमी वाटत असल्या तरी संघाला ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी त्याने आक्रमक बॅटिंग करुन अनेक वेळा संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याने 10 विकेट्स देखील मिळवल्या. एकूणच तेवतियाने आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं.

ईशान किशन (Ishan Kishan)

मुंबईच्या ईशान किशनसाठी यंदाचा हंगाम विशेष लक्षवेधी ठरला. ईशान किशनने या हंगामात 14 मॅचमध्ये 516 धावा फटकावल्या, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. या मोसमात अवघ्या एका रन्सने त्याचं शकत हुकलं.धावांचा पाठलाग करताना असू देत किंवा प्रथम बॅटिंग करत असतानाअसू देत आपल्या आक्रमक अंदाजात किशनने फटकेबाजी केली. ज्यावेळी संघाला धावा हव्या आहेत त्यावेळी त्याची बॅट बोलली. आता हे पाहणं औत्सुक्याचं आहे की निवड समिती किशनला कधी संधी देते.

अब्दुल समद (Abdul Samad)

जम्मू काश्मीरच्या अब्दुल समदने यंदाच्या आयपीएल हंगामात आपलं टॅलेंट दाखवलं. 19 वर्षीय समदने 12 मॅचमध्ये 22.20 च्या सरासरीने 111 धावा केल्या. या हंगामात जेव्हा-जेव्हा त्याने बॅटिंग केली तेव्हा तेव्हा त्याची तुलना विस्फोटक बॅट्समन युसुफ पठाणशी केली गेली. त्याचे सिक्स मारण्याचे अंदाज युसुफसारखे होते.

टी नटराजन ( T Natrajan)

हैदराबादकडून खेळणाऱ्या टी.नटराजनने यंदाच्या मोसमात आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या बॅट्समनला घायाळ केले. त्याने टाकलेल्या यॉर्कर्सवर दिग्गज बॅट्समनची भंभेरी उडाली. या मोसमात त्याने 16 मॅच खेळल्या ज्यामध्ये त्याने 16 विकेट्स मिळवल्या. या सीझनमध्ये त्याने सर्वाधिक 160 यॉर्कर्स टाकत विरोधी टीमच्या बॅट्समनला जेरीस आणले.

(Top 5 young Player Of IPL 2020 Who Can Enter in indian team)

संबंधित बातम्या

IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड

IPL | 13 वर्षात मुंबईने पाचव्यांदा किताब जिंकला, ‘हे’ तीन संघ मात्र अजूनही विजेतेपदापासून दूर

India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात