India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात

टी 20 मालिकेला 4 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India Tour Australia | टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीसह मैदानात

मेलबर्न : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020 Final) मोसमात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. यासह मुंबईने 5 व्यांदा विजेतपद पटकावलं. यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे . या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलिया नव्या जर्सीत दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने नव्या जर्सीच अनावरण केलं आहे. india tour australia the australian mens cricket team will play in a new jersey in the T20 series against India

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या जर्सीबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आज बुधवारी (11 नोव्हेंबर) या जर्सीचं अनावरण केलं. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांच्या देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. या योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी विशेष जर्सीचं डिझाईन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्ध टी 20 मालिकेत ही स्पेशल जर्सी परिधान करणार आहे.

“या जर्सीची डिझाईन अ‍ॅसिक्स, टी फिओना क्लार्क आणि कोर्टनी हॉगेन यांनी केलं आहे. टी फिओना क्लार्क या दिवंगत क्रिकेटपटू मस्किटो कुसेन्स यांच्या वशंज आहेत. ही जर्सी मूळ, विद्यमान आणि भविष्यातील स्वदेशी खेळाडूंना समर्पित आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली. “ही जर्सी घालून खेळण्यासाठी मी उत्साहित आहे”, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्केने दिली. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अशी जर्सी परिधान केली होती.

टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. एकूण 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार आहे. त्यानंतर 3 टी 20 सामने खेळण्यात येणार आहेत. यानंतर शेवटी एकूण 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. तर कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर बाबा होणार होणार आहे. त्यामुळे उर्वरित 3 कसोटी सामन्यातून त्याने माघार घेतली आहे. बीसीसीआयने विराटला पालक्तवाची रजा मंजूर केली आहे.

मालिकानिहाय सामने आणि वेळापत्रक

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Tour of Australia | कसोटी मालिकेदरम्यान या कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

india tour australia the australian mens cricket team will play in a new jersey in the T20 series against India

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI